• Download App
    Devendra Fadnavis विजयाच्या उत्सवाच्या भाषणात फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंचे अभिनंदन; राष्ट्रवादीचाही उल्लेख, पण अजितदादांचे नावही नाही घेतले!!

    विजयाच्या उत्सवाच्या भाषणात फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंचे अभिनंदन; राष्ट्रवादीचाही उल्लेख, पण अजितदादांचे नावही नाही घेतले!!

    नाशिक : महाराष्ट्रातल्या 29 पैकी 25 महापालिकांमध्ये भाजप महायुतीने विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या भाजप मुख्यालयात विजय उत्सव साजरा केला. या विजय उत्सवात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले त्यांनी राष्ट्रवादीचाही उल्लेख केला, पण संपूर्ण भाषणात त्यांनी अजितदादांचे एकदाही नाव घेतले नाही. मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो त्यांना मी अभिनंदनचा फोन केला होता. त्यांचाही मला अभिनंदनचा फोन आला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण त्यांनी अजितदादांचे नाव घेतले नाही.

    देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा विजय महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून पक्षाध्यक्ष जेपी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कार्याध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंतची नावे घेतली. महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांचे आभार मानले. त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आठवले या गटांची नावे घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले. भाजपच्या राजकारणाचा आत्मा हिंदुत्व आणि विकास असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. विकास हा आमचा अजेंडा आहे. विकास आणि हिंदुत्व हे परस्पर विरोधी शब्द नाहीत. विकासाला हिंदुत्वापासून वेगळे काढता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.



    – अजितदादांची राजकीय चूक

    पण देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण भाषणात अजित पवारांचे नाव एकदाही घेतले नाही. कारण अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मित्रपक्ष म्हणून निवडणूकच लढविली नाही. त्यांनी भाजपला “शत्रूस्थानी” ठेवून निवडणूक लढविली. निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या तरी एकमेकांच्या विरोधात बोलायचे नाही एकमेकांच्या नेत्यांवर टीका करायची नाही असे महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांच्या नेत्यांनी ठरविले होते त्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजकीय पथ्य पाळले. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर टीका करणे टाळले होते. त्याचबरोबर या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली नव्हती.

    – अजितदादांकडून महायुतीच्या धर्माची अवहेलना

    त्याच्याबरोबर उलट अजितदादा वागले. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. महायुतीच्या नेत्यांनी ठरविले होते, त्या पद्धतीने ते वागले नाहीतच, उलट त्यांनी भाजपच्याच नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पुण्यात चंद्रकांतदादा पाटील, मुरलीधर मोहोळ आणि पिंपरी चिंचवड मध्ये महेश लांडगे यांना वैयक्तिकरित्या टार्गेट केले. त्याचा परिणाम त्यांच्यावर उलटला. दोन्ही महापालिकांमध्ये पवार काका – पुतण्यांचा दारुण पराभव झाला. भाजपने तिथे प्रचंड विजय मिळवला.

    – अजितदादांना विचारणार जाब

    अजितदादांच्या गैरवर्तणुकीचे पडसादच आजच्या भाजपच्या विजय उत्सवात उमटले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे एकदाही नाव घेतले नाही. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले त्यांचे अभिनंदन केले पण अजित पवारांचा नावाचा उल्लेख टाळून त्यांनी अजितदादांना अप्रत्यक्षपणे पुढच्या राजाकीय भवितव्याचा इशारा दिला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादांच्या वर्तणुकीचा विषय काढूच. त्यांना जाब विचारू, असे चंद्रकांतदादा पाटलांनी आधीच सांगितले होते. आता देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचे नाव न घेता त्यांना तोच “इशारा” दिल्याचे मानले जात आहे.

    In his victory celebration speech, Fadnavis congratulated Eknath Shinde. : Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे झुंजले; पवार हरले : मुंबईत ठाकरे बंधूंची भाजपला कडवी टक्कर; काँग्रेस आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर ठरू शकतो महापौर!!

    पवार ब्रँडचा वाजवला बोऱ्या; चल रे तू टुणुक टुणुक भोपळ्या!!

    ठाकरे ब्रँडचा दबदबा संपला; पवार ब्रँडची राजकीय प्रतिष्ठा धुळीला मिळाली!!