प्रत्येक नातं टिकवून ठेवायचं असेल, तर त्यात वाद झाल्यास ते सावरायलाही लागतात. त्या व्यक्तीच्या स्वभावाबरोबरच नाती पूर्ण जपावी लागतात. वाद झाले, तर नात्यामधलं प्रेम वाढतं आणि आपण समोरच्या व्यक्तीला जास्त चांगल्या पद्धतीनं समजूनही घेऊ शकतो. If there is an argument to keep the relationship going, recover it, don’t stretch too much
मात्र, वाद झाल्यानंतर काही गोष्टी कटाक्षानं टाळायच्या असतात. प्रत्येकानं आपल्या नात्यामधले झालेले वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा. पण मनाविरुद्ध, इच्छा नसताना वाद मिटवले, तर ओझं म्हणून आणि नाईलाज म्हणून ते नातं टिकवू नये.
पराकोटीचे वाद झाले असल्यास असं वाटणं स्वाभाविक आहे. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून किंवा दुसरे काय बोलतील या दबावाखाली कुठलेही निर्णय घेऊन नातं जोडू नका किंवा ते ताणूही नका. तसं केलं, तर तात्पुरतं सगळं ठीक होईल; पण नंत्तर त्या नात्यामध्ये खूप तणाव निर्माण होऊ शकतो. परिणामी, ते नातं जास्त दिवस टिकू शकणार नाही.
सगळं वातावरण थंड झाल्यानंतर वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. वाद झाल्यानंतर ते मिटवण्याची लगेचच घाई करू नका. वाद झाल्यावर प्रत्येकजण लगेचच शांत होईल असं नाही. समोरच्या व्यक्तीला शांत होण्यासाठी थोडा वेळ द्या. राग शांत झाल्यावर वाट मिटवले, तर ते नात्याच्या भविष्यासाठी योग्य असतं. ज्यामुळे वाद होतात ते विषय काढू नका. असा केल्यानं वाद मिटण्याऐवजी वाढतीलच.
ते विषय न काढता त्यावर आपण कशी मात करू शकतो हा विचार करा आणि त्याप्रमाणे समंजसपणे वाद मिटवा. खूप लोक तेच विषय घेऊन त्यावर वाद घालत बसतात. मात्र, तसं न करता शांत डोक्यानं समजूतीनं बोलून वाद मिटवावेत.