• Download App
    नेहरूंनी हॅटट्रिक केली, राजीव 400 पार गेले, तेव्हा लोकशाही "टिकून" "बळकट" झाली; पण मग मोदींनी हॅटट्रिक केली तर...?? If Nehru made hat trick, if rajiv went beyond 400 democracy was "intact", but if Modi wins...??

    नेहरूंनी हॅटट्रिक केली, राजीव 400 पार गेले, तेव्हा लोकशाही “टिकून” “बळकट” झाली; पण मग मोदींनी हॅटट्रिक केली तर…??

    2024 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आज लागत असताना INDI आघाडीने लोकशाहीच्या मुद्द्यावर ढोल + ताशे + नगारे वाजवून तुताऱ्या फुंकायला सुरुवात केली आहे. किंबहुना लोकसभा निवडणुकीचा निकाल आपल्या अपेक्षेनुसार लागला नाही, तर सरकार आणि निवडणूक आयोग यांच्यावर तोफा डागून देशभर निदर्शनांचा धुरळा उडवून देण्याचा विरोधकांचा इरादा आहे. If Nehru made hat trick, if rajiv went beyond 400 democracy was “intact”, but if Modi wins…??

    पण विरोधकांच्या या इराद्यामुळेच एक गंभीर आणि महत्त्वाचा सवाल तयार झाला आहे, तो म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग तीन निवडणुकांमध्ये जिंकून हॅटट्रिक केली. त्यानंतर त्यांचे नातू राजीव गांधी यांनी 1985 मध्ये 400 पार केले, त्यावेळी लोकशाही “टिकून” “बळकट” झाली…!!, पण आता ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 पार ची घोषणा देते आणि तशी शक्यता निर्माण होते, त्यावेळी लगेच लोकशाही “धोक्यात” येऊन देशात “हिटलरशाही” तयार होण्याची “भीती” दाखवली जात आहे!!

    पंडित नेहरूंनी 1952, 1957 आणि 1962 या सलग तीन लोकसभा निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकले. या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसला पंडित नेहरूंचा करिष्मा उपयोगी ठरला. पंडित नेहरूंचे काँग्रेस मधले स्थान एवढे उंच होते की, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आणि पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्या खेरीज बाकीचे कुठलेही दुसरे केंद्रीय मंत्री नेहरूंना किरकोळ स्वरूपात देखील आव्हान देऊ शकत नसत. त्यातले सरदार वल्लभभाई पटेल तर 1950 मध्ये निधन पावले. त्यामुळे पंडित नेहरूंचा खऱ्या अर्थाने वैचारिक प्रशासकीय विरोधक संपला. उरता उरले मौलाना आझाद आणि पंडित गोविंद वल्लभ पंत. परंतु त्यांची देखील क्षमता मर्यादित विरोधात पलीकडे जाऊ शकली नाही. पंडित नेहरूंचे पंतप्रधान म्हणून स्थान कायम उंचावलेले आणि आबाधित राहिले.

    1962 च्या चीन विरोधातल्या युद्धातला पराभव हा वास्तविक पंतप्रधान पंडित नेहरूंच्या स्वप्नाळू राजकीय आणि आंतरराष्ट्रीय धोरणाला लागलेला डाग होता, पण तो डागही नेहरूंच्या राजकीय यशावर परिणाम करू शकला नव्हता, ही वस्तुस्थिती आहे.

    याच पंडित नेहरूंनी 1959 मध्ये इंदिरा गांधी काँग्रेस अध्यक्ष असताना त्यांच्या सूचनेनुसार विरोधकांचे म्हणजेच कम्युनिस्टांचे पहिले राज्य सरकार बरखास्त केले होते. केरळचे कम्युनिस्ट मुख्यमंत्री ईएमएस नंबुद्रीपाद यांना मुख्यमंत्री पदावरून लोकशाही विरोधी मार्गाने म्हणजे राज्यघटनेचे 356 वे कलम वापरून दूर केले होते. तरीही पंडित नेहरूंचा “महान लोकशाहीवादी” याच शब्दांमध्ये काँग्रेसजन गौरव करत होते आणि करतात.



    पंडित नेहरूंनी सलग तीन निवडणुका जिंकूनही भारतीय लोकशाहीला “बाधा” आली नव्हती. लोकशाही “धोक्यात” आली नव्हती. किंवा तिला “ग्रहण”ही लागले नव्हते!!

    1985 मध्ये राजीव गांधींनी लोकसभा निवडणुकीत तब्बल 409 जागा मिळवल्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या लाटेचा राजीव गांधींना एवढा जबरदस्त फायदा झाला की, पूर्व – पश्चिम – दक्षिण – उत्तर या सगळ्या भारतात काँग्रेसच्या हाताच्या पंजावर भारताच्या जनतेने भरभरून शिक्के मारले होते. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नव्हते. राजीव गांधींचा त्यावेळी करिष्मा चालला होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले. ते खऱ्या अर्थाने “एक्सीडेंटेल प्राईम मिनिस्टर” होते. वास्तविक ज्येष्ठतेनुसार प्रणव मुखर्जी किंवा पी. व्ही. नरसिंह राव यांचा पंतप्रधान पदावर हक्क होता. परंतु राजीव गांधींच्या नेतृत्वाच्या उदयापर्यंत नेहरू आणि इंदिरा गांधींची घराणेशाही भारतात एवढी प्रस्थापित झाली होती की, तिच्याविरुद्ध “ब्र” काढण्याची काँग्रेसजनांची हिंमतही नव्हती.

    *इंदिराजींच्या हत्येनंतर दिल्ली आणि देशभर शीख विरोधी दंगली उसळल्या. त्यामध्ये किमान 5000 शिखांची हत्या झाली. त्यावेळी राजीव गांधी म्हणाले होते, “जब बडा पेड गिरता है, तब धरती थोडी हिलती है!!” परंतु त्यावेळी देखील अरुण नेहरुंनी राजीव गांधींना परखड शब्दांत जाणीव करून दिली होती, “जब 5000 सीख मरे, तब जाकर आप प्रधानमंत्री बने!!” असे अरुण नेहरू राजीव गांधींना म्हणाल्याची साक्ष निरजा चौधरी यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे.

    राजीव गांधींनी सलग दोन निवडणुकाही जिंकल्या नाहीत. इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीच्या लाटेत ते 400 पार गेले होते हे खरे, पण ते भव्य दिव्य यश त्यांना पचवता आले नाही, तरी देखील राजीव गांधी 400 पार गेल्यानंतर देशातील लोकशाही “धोक्यात” आली नव्हती. देशात “हिटलरशाही” तयार झाली नव्हती. हुकूमशाहीची “सावली” देशावर पडली नव्हती.

    पण आता मात्र कुठलीही लाट नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे भाजपच्या व्यूहरचनेमुळे, विरोधकांच्या बौद्धिक आणि संघटनात्मक दुर्बलतेमुळे मोदी जेव्हा सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याची हॅटट्रिक करत आहेत, त्यावेळी मात्र लोकशाही “धोक्यात” आली आहे. “हिटलरशाहीचा” “उदय” होतो आहे. हुकूमशाहीची “सावली” देशावर पडली आहे. हे अजब तर्कट विरोधकांनी सुरू ठेवले आहे. ते आणखी काही दिवस किंबहुना काही वर्षे सुरू राहणार आहे.

    If Nehru made hat trick, if rajiv went beyond 400 democracy was “intact”, but if Modi wins…??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार