• Download App
    हिमालयात मानवाचे पाच हजार वर्षे वास्तव्य। Humans have lived in the Himalayas for five thousand years

    हिमालयात मानवाचे पाच हजार वर्षे वास्तव्य

    पुरातत्वशास्त्रातील संशोधनाची डेटिंगची आधुनिक पद्धत वापरून ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी मनुष्याने तिबेटच्या पठाराच्या या दुर्गम भागात पाच हजारांहून अधिक वर्षे वास्तव्य केल्याचा दावा केला आहे. संशोधनाचे निष्कर्ष सायन्स ॲडव्हान्सेस या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील संशोधक जॅन-हेंड्रीक मे आणि वूलनगोंग विद्यापीठातील संशोधक ल्युक ग्लिगॅनिक यांच्या गटाने हे संशोधन केले. मध्य-दक्षिण तिबेटमध्ये पाच हजारांहून अधिक वर्षे मानवी अस्तित्वाचा हा पहिला पुरावा असल्याचा संशोधकांचा दावा आहे. मनुष्याने वस्ती केलेल्या पृथ्वीवरील शेवटच्या प्रदेशामध्ये तिबेटच्या या पठाराचा समावेश होतो. हिमालयानजीक आठ किलो मीटरहून अधिक उंचीच्या पर्वतरांगांमुळे हा प्रदेश मानवी वस्तीसाठी अतिशय प्रतिकूल आहे. त्यामुळे, या प्रदेशात मनुष्याने कुठे आणि केव्हा वस्तीस सुरुवात केली, हा पुरातत्वशास्त्रज्ञांमध्ये वादाचा मुद्दा होता. साधारणपणे दगडावर कोरलेल्या कलाकृतींमधून किंवा पुरातत्व स्थळावरून निसंशयपणे असा निष्कर्ष काढणे अतिशय अवघड असते. कारण काही हजार वर्षांपूर्वी बनविलेल्या या शिल्पांची काळाच्या ओघात झीज होते. Humans have lived in the Himalayas for five thousand years

    त्यामुळे संशोधकांनी ‘ओएसएल डेटिंग’ या नवीन पद्धतीचा वापर केला. त्यातून, तिबेटच्या पठारावरील मानवी वस्तीबाबत अंदाज बांधला. संशोधकांनी पुरातत्वशास्त्रातील ‘ओएसएल डेटिंग’ ही नवी पद्धत वापरली. वाळूच्या दाण्यातील स्फटिक किंवा क्रिस्टलच्या रचनेमधील ऊर्जेवर हे तंत्र आधारित आहे. वाळू सूर्यप्रकाशापासून दूर असल्यावर तसेच पुरली गेल्यावर आसपासचे खडक व गाळाच्या कमी विकिरणामुळे त्यातील स्फटिकातील ऊर्जा साठविली जाते. ती प्रयोगशाळेत निळ्या किंवा हिरव्या प्रकाशाच्या मदतीने मोजली जाते. ऑस्ट्रियातील ‘ओएसएल’ प्रयोगशाळेत संशोधकांनी यासंदर्भात अनेक वर्षे संशोधन केले. त्याचप्रमाणे, संशोधकांनी खडकाच्या पृष्ठभागाशी संबंधित डेटिंग पद्धतीवर अधिक भर दिला. त्यानुसार, तिबेटच्या पठारावरील सुरे या पुरातत्व ठिकाणावरील मानवनिर्मित दगडांची हत्यारे किंवा शिल्पे ५,२०० ते ५,५०० वर्षांपूर्वीची असल्याचे आढळले.

    Humans have lived in the Himalayas for five thousand years

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!