नाशिक: जगभरातल्या करोडो राम भक्तांच्या स्वप्नातले श्रीराम जन्मभूमी मंदिर सध्या अयोध्येत उभारले जात आहे. हे मंदिर नेमके कसे साकारले जात आहे त्याचा एक विलक्षण पट एका त्रिमिती चित्रफितीतून (थ्रीडी फिल्म) श्रीराम जन्मभूमि मंदिर ट्रस्टने सादर केला आहे. How to build Shri Ram Janmabhoomi Temple in Ayodhya ?, Watch this 3D movie !!
श्री राम जन्मभूमी मंदिराची जागा कशा पद्धतीची आहे, अयोध्येचा विकास कसा होतो आहे, अयोध्या रेल्वे स्टेशनपासून मंदिरापर्यंत कसे जायचे आहे, या मार्गाचा विकास कसा होतो आहे, त्याचबरोबर मंदिराच्या प्रत्यक्ष पायाभरणी पासून ते उभारणी पर्यंत कोणत्या टप्प्यांमध्ये मंदिराचे बांधकाम होत आहे हे सर्व आपल्याला या त्रिमिती चित्रफितीतून दिसते आहे.
अयोध्येत कारसेवक पुरम येथे अनेक वर्षांपासून कारागीर पत्थरातून मोठे नक्षीदार खांब साकारताहेत. करोडो नागरिकांनी आपले योगदान या मंदिरासाठी दिले आहे. त्याच बरोबर लाखो कारसेवकांना प्रत्यक्ष कारसेवा करून रामजन्मभूमी मोकळी केली आहे. आता त्या जन्मभूमीवर हे मंदिर कोणत्या पद्धतीने साकारले जात आहे त्याची वैशिष्ट्य काय आहे आहेत, मंदिर साकारण्याचे नेमके टप्पे कोणते आहेत हे आपल्याला या त्रिमिती चित्रफितीत दाखविण्यात आले आहे.
एल अँड टी आणि टाटा या कंपन्या या मंदिराचे प्रत्यक्ष बांधकाम करत आहेत. या बांधकामा बरोबरच संपूर्ण मंदिर परिसराचा आणि अयोध्या शहराचा कायाकल्प होताना यामध्ये दिसत आहे. श्रीराम जन्मभूमि मंदिर ट्रस्टने पाच मिनिटांची त्रिमिती चित्रफित सादर केली आहे. हे भव्य मंदिर साकारताना पाहून करोडो राम भक्तांच्या नयनातून आनंदाश्रू तरळत आहेत.
How to build Shri Ram Janmabhoomi Temple in Ayodhya ?, Watch this 3D movie !!
महत्त्वाच्या बातम्या
- अखिलेश यादवांची राजकीय चतुराई; ट्विटर हँडलवर मोदी – ममतांच्या लोकप्रिय घोषणांचे प्रतिबिंब!!
- दाऊद इब्राहिमचा भाचा सोहेल कासकर भारतीय एजन्सीच्या हातातून निसटला, दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचला
- PUNE : आता सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय जाण्यास नागरिकांना बंदी , जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले आदेश