Thursday, 1 May 2025
  • Download App
    विज्ञानाची गुपिते : बर्फ पाण्यावर कसा काय तरंगतो How ice floats on water

    विज्ञानाची गुपिते : बर्फ पाण्यावर कसा काय तरंगतो

     

    उन्हाळ्याचा सध्याच्या दिवसात बर्फ खाणे सर्वांनाच आवते. सध्याच्या काळात प्रत्येकाच्या घऱात फ्रीज असल्याने घरातच बर्फ तयार केला जातो. हा बर्फ कधी कधी पाण्यात टाकून आपण पाणी थंडगार करतो. How ice floats on water

    त्याचप्रमाणे आपण बाहेर उसाचा रस, लिंबू सरबत पिताना ते थंड करण्यासाठी ग्लासात बर्फाचा तुकडा टाकला जातो. यावेली आपल्या लक्षात एक बाब नक्की येते ती म्हणजे पाणी असोवा उसाचा रस. त्यामध्ये टाकलेला बर्फ कधीही खाली बुडत नाही. तो त्या द्रवपदार्थावर नक्कीच तरंगतो. आपण नेहमीच्या रोजच्या जीवनाता याचा अनेकदा अनुभव घेतला असेल. पण पाण्यावर बर्फ का तरंगतो याचे नेमके कारण जर तुम्हाला माहिती करुन घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला थोर शास्त्रज्ञ आर्किमिडीजच्या तत्वाचा अभ्यास करावा लागेल. असे केल्यास याचा उलगडा नक्कीच होईल.

    आर्किमीडीजचा नियम असे सागतो, तरंगणारा पदार्थ स्वत:च्या वजनाएवढा द्रव विस्थापित करतो. म्हणजे समजा, जर एखादी लाकडाची फळी पाण्यावर तरंगते आहे, तर तिने विस्थापित केलेल्या पाण्याचे वजन हे फळीच्या वजनाएवढे असते. लाकडाची फळी जर पाण्यात सोडल्यास तुमच्या असे लक्षात येईल की फळी एकदम तरंगायला लागत नाही. जशी जशी ती पाण्यात बुडु लागते तसतसे तिच्यामुळे काही पाणी विस्थापित होऊ लागते. ज्या क्षणाला तिने विस्थापित केलेल्या पाण्याचे वजन हे फळीच्या वजनाएवढे होते त्याच क्षणाला ती तरंगायला सुरवात होते.

    बर्फ पाण्यावर तरंगतो तो याच कारणामुळे. पाण्याचा बर्फ होताना त्याचे आकारमान वाढून, त्याची घनता कमी होते. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर बर्फ ठेवला तर बर्फाचा तुकडा पूर्णपणे बुडायच्या आधी स्वतःच्या वजनाएवढे पाणी विस्थापित करतो. म्हणून तो पूर्ण बुडत नाही. याच तत्वाने जहाज पाण्यावर तरंगते.

    How ice floats on water

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मोदी तिकडे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायच्या बेतात; पवार इकडे दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलात!!

    RSS chief Mohan Bhagwat प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मोदींच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा, पण नेमके गूढ काय??

    PM Modi : पाकिस्तानात घुसून मारताना भारतीय सैन्य दलांमध्ये आता राजकीय हस्तक्षेप नाही, पण तो केव्हा आणि कुणी केला होता??