आपण जेव्हा शरीराच्या फिटनेसचा विचार करतो, तेव्हा मसल्स बनवणं, तरुणांसाठी सिक्स पॅक एब्स बनवणं हाच विचार असतो. पण फिटनेसचा विचार करताना शारीरिक आरोग्या बरोबर मानसिक आणि आपल्या मेंदूच्या आरोग्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. आपला मेंदू, हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट असताना, त्याच्या सलामतीकडे लक्ष नाही दिलं तर चांगलं आरोग्य आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चांगलं आयुष्य आपण कसं मिळवू शकू? Here’s how to put one together for use with your brain
नव्या-नव्या गोष्टी शिकण्यापासून, व्यक्तिमत्त्व विकासाकडे सुद्धा जो लक्ष देतो तो आपसूकच इतर शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतो, हे तुम्ही आजूबाजूला नजर टाकली तर सहज जाणवेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही टिप्स फॉलो केल्या तर शारीरिक आरोग्याबरोबर तुमच्या मेंदूचे आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवायला तुम्हाला मदत होईल. आपल्या आहारात भरपूर फळं आणि भाज्यांच्या समावेश करा. मेंदूची कार्यक्षमता चांगली ठेवण्यासाठी फळे अँटीऑक्सिडंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. भरपूर प्रमाणात फळं आणि भाज्या आहारात असतील तर अँटीऑक्सिडंट्सची कमतरता राहत नाही. हे अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या कार्यक्षमतेबरोबरच बऱ्याचशा आजारांमध्ये सुद्धा संजीवनी ठरतात. फॅट्स वाढतील असा आहार टाळावा. मेदयुक्त खाण्याने, मेंदूच्या हायपोथॅलॅमस रिजनच्या कार्यप्रणालीमध्ये बिघाड होतो.
ओबेसिटी म्हणजे अति वजन असलेल्या व्यक्तींमध्ये डिप्रेशन येण्याच्या जास्त शक्यता असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. शरीरात अति फॅट्स असल्यास अँटी डिप्रेसंट औषधांचा प्रभाव होणे सुद्धा कठीण जाते. हेही एका अभ्यासातून सिद्ध झालेले आहे. उत्तेजक पदार्थ किंवा हौस म्हणून केले जाणारे व्यसन टाळावे. उत्तेजक पदार्थ, दारू किंवा सिगारेटचे व्यसन हे मेंदूच्या आरोग्यासाठी घातक असते. मद्य आणि तंबाकुजन्य पदार्थ मज्जासंस्थेवर आघात करतात. ज्यामुळे कालांतराने न्यूरॉलॉजिकल आजार होण्याची शक्यता वाढते.