मेंदू हा शऱीराताला सर्वात मुख्य अवयव आहे. याची आपणा सर्वांनाच कल्पना असते. साऱ्या शरीराचे नियंत्रण मेंदूच करीत असतो. त्यामुळे प्रत्येकानेच मेदूची विशेष काळजी घेण्याची गरज असते. Here is a proper diet for brain growth
मात्र आपण खास मेंदूसाठी म्हणून विशेष असे काही लक्ष देत नाही किंवा त्यासाठी काय पोषक आहार आहे हे जाणून तो आहार सेवन करत नाही. मात्र सध्याच्या तणावाच्या काळात अशा आहाराची नितांत गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे. मेंदूच्या वाढीसाठी योग्य आहार हे महत्वाचे सूत्र आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.
मेंदूची वाढ होण्याकरिता फोलिक ऍसिड, जस्त, जीवनसत्त्व क यांची नितांत गरज असते. बाजरी, ज्वारी, मका, गहू, पालेभाज्या, यात फोलिक ऍसिड विपुल असते; परंतु अन्न शिजवताना फोलिक ऍसिडचे विघटन होते, याकरिता आहारात कोशिंबिरी व फळे, तसेच दूध, दही, ताक यांचा मुबलक समावेश असावा. जीवनसत्त्व क ताज्या फळातून मिळते, त्यात आवळा आणि पेरू ही फळे विशेष उल्लेखनीय आहेत.
तृणधान्यातून आणि कडधान्यातून जस्त मिळते. जस्त आतड्यांतून शोषले जावे यासाठी पाय-कोलिनिक ऍसिड या रेणूचा खूप उपयोग होतो. पाय-कोलिनिक ऍसिड मातेच्या दुधात असते, परंतु गाई-म्हशींच्या दुधात नसते, यावरून मातेने आपल्या बाळाला दूध पाजण्याचे महत्त्व लक्षात येईलच. मेंदूची वाढ गर्भस्थ स्थितीतील बालकाची सातव्या महिन्यात दर मिनिटाला अडीच लक्ष नव्या पेशींच्या निर्मितीने होत असते.
यावरून मातेच्या आहाराचे आणि एकूण प्रकृतीच्या स्वास्थ्याचे महत्त्वही समजेलच. अर्थात मुल मोठे होतानाही त्याच्या आहारवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे मोठे झाल्यावरही ताजी फळे, सकस व ताजे अन्न खाणे गरजेचे असते.