• Download App
    पाउस कोसळताना चक्क आकाशातून मासे खाली पडल्याचे आपण पाहिलंय?। Have you ever seen a fish fall from the sky when it is raining?

    पाउस कोसळताना चक्क आकाशातून मासे खाली पडल्याचे आपण पाहिलंय?

    सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र जोरदार सरी कोसळतात. त्यामुळे नद्यांना पूर येतो. पावसाची वेगवेगळी रुपे आपण पावसाळ्यात अनुभवत असत. कधी पाउस रिमझिम बरसत असतो तर कधी अक्षरशः कोसळत असतो. पावसाच्या रुपान पृथ्वीवर पाणी पडते. त्या पाण्यातून जीवसृष्टी साकारते. जमिनीवरील पाण्याचे बाष्पीभवन होवून त्याचे वाफेत रुपांतर होत व पुन्हा तेच पाणी ढगाच्या रुपातून कोसळते. ही प्रक्रिया सर्वानाच माहिती आहे. पण पाउस कोसळताना पाण्यातून कधी मासे खाली पडल्याचे आपण पाहिले आहे किंवा ऐकले आहे का. चक्क माशांचा पाउस. Have you ever seen a fish fall from the sky when it is raining?

    खरं सांगायचे झाल्यास जगात माशांचा पाऊस पडतो, हे सोळा आणे सत्य आहे. पण, या मागच्या कारणांचा पुरेपूर उलगडा आजपर्यंत विज्ञानालही करता आलेला नाही! आंध्रप्रदेश राज्यात एका ठिकाणी १९ जून २०१५ रोजी माशांचा पाऊस पडला होता! होंडुरास नावाच्या देशातील योरो या ठिकाणी मे व जून महिन्यात दोनदा आकाशातून मासे कोसळतात! साधारण हे पाव किलोपर्यंतचे मासे असतात. या देशात मागील १०० वर्षांपासून हा प्रकार दरवर्षी घडत असल्याचे सांगितले जाते. समुद्रात जेव्हा वादळ उठते तेव्हा पाण्याच्या वावटळी तयार होऊन मासे वर जातात आणि नंतर ते खाली कोसळतात, असे सर्वसाधारण उत्तर विज्ञानाचे आहे! परंतु, योरों हे ठिकाण समुद्रापासून खूप लांब आहे, ही बाब ध्यानात घ्यावीच लागते. काही लोक बेडूक, साप, विंचू आदिंचाही पाऊस पडत असल्याचे सांगतात. पण, याची सत्यता कोणी तपासून पाहिलेली नाही.

    माशांचा पाऊस पडण्यामगे दंतकथा मात्र भरपूर आहे. होंडुरास मध्ये १८५६ ते १८६४ या काळात खूप दुष्काळ पडल्याने लोक उपासाने तडफडून मरत होते. त्यामुळे धर्म उपासक सुबिरान याने माशांचा पाऊस पाडून लोकांची भूक शमवली, अशी तेथील लोकांची धारणा आहे. थोडक्यात माशांचा पाउस पडतो पण त्यामागील कारणांचा अद्याप पुरेसा उलगडा झालेला नाही.

    Have you ever seen a fish fall from the sky when it is raining?

    Related posts

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!