हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांच्या रूपाने महाराष्ट्राला राजस्थान सारख्या राणा प्रताप यांच्या भूमीमध्ये राज्यपाल होण्याची चौथ्यांदा संधी मिळाली आहे. याआधी 1980 च्या दशकात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (vasantdada patil)आणि त्यानंतर 2004 मध्ये प्रतिभाताई पाटील यांना ही संधी मिळाली होती. त्यानंतर प्रभा राव (Prabha rao) राजस्थानच्या राज्यपाल होत्या. Haribhau bagde fourth governor of rajasthan from maharashtra
वसंतदादा पाटील, प्रतिभाताई पाटील, प्रभा राव आणि हरिभाऊ बागडे या चारही नेत्यांच्या राजकीय पृष्ठभूमी पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. हरिभाऊ संघाच्या मुशीतून घडून जनसंघापासून ते भाजप पर्यंतच्या प्रवासाचे सक्रिय साक्षीदार आहेत, ते मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, तर 2014 ते 2019 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते, तर वसंतदादा पाटील आणि प्रतिभाताई पाटील हे दोन्ही काँग्रेसी राजकारणामध्ये मुरलेले नेते होते. हरिभाऊ बागडे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांना राजस्थानच्या राज्यपाल पदाचा मान मिळाला आहे आणि तो त्यांनी तितक्याच सन्मानाने स्वीकारला आहे.
वसंतदादा पाटील यांच्या बाबतीत मात्र तसे म्हणता येणार नाही. किंबहुना राजीव गांधींनी त्यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीची अखेर महाराष्ट्रात न होता की राजस्थानात व्हावी, अशा राजकीय हिशेबानेच त्यांना राजस्थानचे राज्यपाल केले होते. मोठ्या अनिच्छेने वसंतदादा सांगलीतून जयपूरला गेले होते. जयपूरच्या राजभवनात ते मनापासून कधीच रमले नाहीत. त्याच्या बातम्या त्या वेळच्या महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांमध्ये रंगवून येत असत. महाराष्ट्रातले कुठेही नेते तो पत्रकार जयपूरला वसंतदादांना भेटायला गेले, की ते त्यांच्या मनातली खंत बोलवून दाखवत असत. जयपूरच्या राजभवानातून वसंतदादा महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत अशी व्यंगचित्रे त्यावेळी मराठी माध्यमांतून प्रसिद्ध झाली होती.
महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वसंतदादा पाटील हे देखील काँग्रेस श्रेष्ठींच्या डोळ्यात खूपत असत. महाराष्ट्रातली काँग्रेस यशवंतराव किंवा वसंतदादांच्या अंकित असण्यापेक्षा ती काँग्रेस श्रेष्ठींच्या अंकित राहावी या हेतूने काँग्रेस श्रेष्ठींनी या दोन्ही नेत्यांना महत्त्वाच्या पदांवरून अत्यंत कठोरपणे बाजूला केले होते. त्यापैकी यशवंतराव त्यांच्या अखेरच्या काळात पूर्णपणे निष्प्रभ झाले होते, पण वसंतदादा मात्र ऍक्टिव्ह राहायचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांचे पंख छाटण्यासाठीच राजीव गांधींनी त्यांची नियुक्ती राजस्थानच्या राज्यपाल पदावर केली होती.
प्रतिभाताई पाटलांना देखील सोनिया गांधी यांच्या काँग्रेसने ऍक्टिव्ह राजकारणातून बाजूला करण्यासाठीच राजस्थानच्या राज्यपाल पदी नेमले होते. 2004 ते 2007 या काळात त्या जयपूरच्या राजभवन होत्या. पण नंतर त्यांची राजकीय नशीब अचानक फळफळले आणि त्या जयपूरच्या राजभवन आतून एकदम राष्ट्रपती भवनात विराजमान झाल्या. देशात आतापर्यंत एकही महिला राष्ट्रपती झाली नाही. त्यामुळे एखाद्या महिलेला ती संधी द्यावी, अशी टूम त्यावेळी काँग्रेस मधून बाहेर आली. पण सोनिया गांधी यांना सक्षम महिलाच सापडेना. त्यावेळी राज्यपालांची यादी समोर आणा, असे त्या म्हणाल्या आणि त्यामध्ये राजस्थानच्या राज्यपाल पदावरच्या प्रतिभाताई पाटलांचे नाव त्या यादीतून समोर आले. सोनिया गांधींनी त्यांची वर्णी थेट राष्ट्रपतीपदी लावली.
त्यानंतर प्रभा राव यांना देखील सोनिया गांधींनी महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला काढत जयपूरच्या राजभवनात पाठवले होते. प्रभा राव यांनी 1980 च्या दशकात आणि त्यानंतर 2004 नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पद सांभाळले होते. काँग्रेसच्या कसोटीच्या काळात त्यांनी प्रदेश पातळीवरचे संघटन मजबूत ठेवले होते. पण गटबाजीच्या राजकारणामुळे सोनिया गांधींनी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला करून राजस्थानच्या राज्यपाल पदी नेमले होते.
त्यामुळे जयपूरचे राजभवन मराठी नेत्यांसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी कायम महाराष्ट्राच्या चर्चेत राहिले. वसंतदादा पाटील तिथे अनिच्छेने गेले, तर प्रतिभाताईंचे तिथे राजकीय भाग्य फळफळले. आता हरिभाऊंचे राजकीय भवितव्य जयपूरच्या राजभवनातून नेमके कोणते वळण घेते??, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Haribhau bagde fourth governor of rajasthan from maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Sudhir mungantiwar targets sharad pawar : 7 खासदारांच्या नेत्याला पंतप्रधान सोडा, गृहमंत्री देखील होता येत नाही, तेव्हाच…!
- कुपवाडात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान जखमी, एक शहीद
- आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या, पात्रता काय असावी?
- विधान परिषदेत शेकापचा उमेदवार पडला, मविआतले छोटे पक्ष दुखावले, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा आता स्वबळाचा नारा!!