जागतिक तापमानवाढ आणि महासागरांच्या वाढत्या आम्लतेचा परिणाम प्रवाळांच्या अधिवासावर होत असून, अशीच स्थिती कायम राहिल्यास पुढील वीस वर्षांत 70 ते 90 टक्के प्रवाळांचे अधिवास नष्ट होतील, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पृथ्वीवरील सर्वांत जास्त जैवविविधता आणि उत्पादनक्षमता असलेला घटक म्हणून प्रवाळांना ओळखले जाते. महासागरांच्या तळातील सुमारे एक टक्के पृष्ठभागावर प्रवाळांचा अधिवास आहे. मासे, खेकडे, सरपटणारे प्राणी, समुद्री साप, बुरशी आदी चार हजार समुद्री जिवांचे पोषण आणि अधिवास प्रवाळांवर अवलंबून आहे. जगातील शंभर देशांमधील पन्नास कोटी लोकांच्या अन्नामध्ये प्रवाळांचा समावेश आहे. Global Warming Threatens Coral Existence
जगात सुमारे 375 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था प्रवाळांच्या उत्पादनावर अवलंबून आहे. अरबी समुद्रात कच्छ, मुन्नार आखातांसह लक्षद्वीप आणि बंगालच्या उपसागरात अंदमान-निकोबार बेटांजवळील समुद्रात गेल्या पाच कोटी वर्षांपासून प्रवाळांचा वैविध्यपूर्ण अधिवास आहे. वाढती मासेमारी आणि मासेमारीच्या चुकीच्या पद्धती, समुद्रातील बांधकाम, प्रदूषण, प्लॅस्टिक, रोगराई आणि घनकचऱ्याची समुद्रात लावलेली विल्हेवाट याबरोबरच त्सुनामी, अल निनो, महासागरांतील वादळे, भूकंप आदींचा परिणाम प्रवाळांवर होतो. हे सर्व परिणाम विशिष्ट प्रदेशाशी निगडित असू शकतात, त्यांचा संपूर्ण प्रवाळांच्या अस्तित्वावर परिणाम होत नाही. पण, जागतिक तापमानवाढ आणि महासागरांच्या वाढत्या आम्लतेमुळे संपूर्ण प्रवाळांचे अस्तित्वच धोक्याजत आले आहे.
साधारणपणे 23 ते 29 अंश सेल्सिअस तापमान हे प्रवाळांच्या अधिवासासाठी योग्य आहे. एकविसाव्या शतकात जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे तापमानातील हा बदल प्रवाळांच्या काही प्रजातींसाठी निश्चिअतच धोकादायक आहे. तसेच, जगभरात वाढलेले कार्बन उत्सर्जन ही प्रवाळांसाठी धोक्याबची घंटा ठरली आहे. दिवसाला दोन कोटी वीस लाख टन कार्बन महासागर त्यांच्या पोटात घेतात. यामुळे त्यांच्यातील आम्लतेत वाढ होते. ही वाढलेली आम्लता प्रवाळांसाठी आधाराचे कार्य करणाऱ्या कॅल्शिअम कार्बोनेटच्या सांगाड्याची झीज करण्यास सुरुवात करते. त्यामुळे प्रवाळांचा अधिवास धोक्या्त येतो. तसेच, वाढत्या प्लॅस्टिक प्रदूषणामुळे सूर्यप्रकाश प्रवाळांपर्यंत पोचण्यास प्रतिबंध होतो.