• Download App
    घरात बसल्या बसल्याही मिळवा उत्तम पैसे Get the best out of sitting at home

    घरात बसल्या बसल्याही मिळवा उत्तम पैसे

    कोरानामुळे सार वर्क कल्चर बदलले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांना वेतन कपातील सामोरे जावे लागले आहे. अशा कसोटीच्या काळातही घरबसल्या पैसे मिळवता येतात हे ऐकून आपल्याला धक्का बसेल. पण यात तथ्य आहे. सध्या बाजारात जशी अडचमी आहे त्याचप्रमाणे सुवर्णसंधीही हात जोडून उभ्या आहेत. त्यासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. Get the best out of sitting at home

    घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून मनाप्रमाणे काम करणे आणि चार पैसे गाठीला बांधणे शक्य आहे. उद्योजक, व्यावसायिकांना नेहमीच विविध पातळ्यांवर मदतीची गरज भासते. त्यामुळे प्रामुख्याने बैठकांचे नियोजन करणे, त्यांच्या ग्राहकांशी संपर्क साधणे, गुंतवणूकदारांशी चर्चा करणे, ऑर्डर नोंदवणे, त्यांच्यासाठी पॉवरपॉइंट प्रेझेंटेंशन सादर करणे, त्यांचे ब्लॉग किंवा वेबसाइट अपडेट करणे आदी कामांसाठी मदतनीसाची आवश्यकता भासतेच.

    व्यावसायिक दिवसभर व्यग्र असेल तर, ही कामे करण्यासाठी व्हर्च्युअल असिस्टंट हा चांगला पर्याय ठरू शकतो. संबंधिताकडे संवाद साधण्याची हातोटी, इंग्रजीवर प्रभुत्व, तंत्रज्ञानाची माहिती असेल तर ती व्यक्ती घरबसल्या चांगली कमाई करू शकते. ज्यांच्याकडे वरीलप्रमाणे कौशल्य असेल अशांनी Elance.com किंवा Zirtual.com या वेबसाइटशी संपर्क साधावा.

    जर तुम्हाला दोन किंवा तीन भाषा अवगत असतील, तर भाषांतरातील मोठ्या प्रमाणावरील संधींचा तुम्ही घरबसल्या अर्थार्जनासाठी उपयोग करू शकता. त्यासाठी किमान इंग्रजीवर प्रभुत्व आणि अन्य दोन भारतीय भाषांची चांगली जाण असणे आवश्यक आहे. इंग्रजीव्यतिरिक्त दोन भारतीय भाषा अवगत असतील तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुस्तके, जर्नल यांच्या भाषांतराचे काम प्राप्त होऊ शकते. तुम्ही चांगले भाषांतरकार असाल तर, Fiverr.com किंवा Upwork.com या वेबसाइटवर जाऊन उपलब्ध संधींचा लाभ घेण्यात हरकत नाही.

    गेल्या दशकभरात आपल्याकडे ब्लॉगच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. नियमित ब्लॉगलेखन करणाऱ्यांचे ब्लॉग हेरून गुगल अॅडसेन्सतर्फे तेथे जाहिरातींच्या लिंक प्रदर्शित करण्यात येतात. ब्लॉगला भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यास मोठ्या प्रमाणावर जाहिराती मिळण्यास सुरुवात होतात. त्यातून संबंधित ब्लॉगरला घरबसल्या कमाई होऊ शकते. ब्लॉगला मिळणाऱ्या हीट्स आणि लाइक्स यातून जाहिरातीचा दर आणि ब्लॉगरची कमाई ठरते. या शिवाय तुम्ही स्वतंत्रपणेही ब्लॉगच्या मदतीने कमाई करू शकता. जाहिरातदारांच्या जाहिराती आपल्या ब्लॉगवर पोस्ट करण्याची परवानगी देऊनही घरबसल्या कमाई करता येऊ शकते.

    Get the best out of sitting at home

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!