माणूस हा सवयीचा गुलाम आहे असे म्हटले जाते. यात नीट विचार केला तर पूर्ण तथ्य आहे. कारण लहानपणापासून आपण रोज ज्या बाबी करीत असतो त्यामागे सवयींचा फार मोठा वाटा असतोच. जर सवयी चांगल्या असतील तर त्या व्यक्तीची प्रगती हि ठरलेली असते. आणि सवयी वाईट असतील तर त्याचा अंत निश्चित होणारच. आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासात चांगल्या सवयींचा फार महत्वाचा वाटा असतो. त्यामुळे चांगली संगत व चांगल्या सवयी लागण्यासाठी प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे असते. Follow up until you succeed
एकदा का चांगल्या सवयी लागल्या की त्याचे प्रत्यंतर आपल्याला पदोपदी अनुभवायला मिळतेच. आपल्या वैयक्तिक विकासात या चांगल्या सवयी हातभार लावतात. तसे पहायला गेले तर शेवट हा प्रत्येक गोष्टीला आहे पण जेव्हा आयुष्याच्या शेवटी मागे वळून पाहताना खंत न राहता समाधानाचे हसू असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने नेहमी सर्वात अगोदर तुमचे ध्येय ठरवून घ्यावे. म्हणजे तुम्हाला त्या ध्येयानुसार कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या समजून येतील. प्रत्येकाने स्वतःला नेहमी एक सवय लावून घ्यावी. ती म्हणजे जो पर्यंत यश मिळत नाही तो पर्यंत माघार न घेणे.
अपय़शातून खचून न जाता यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणे फार आवश्य असते. त्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करणे गरजेचे तर असतेच पण त्यात सातत्या राखणेही गरजेचे असते. तसेच वाढत्या स्पर्धेच्या जगात वावरण्यासाठी सतत नवीन नवीन गोष्टी शिकत राहणे हे देखील आवश्यक आहे. तर मग यश मिळण्यास कोणतीच अडचण येत नाही. भूतकाळात घडलेल्या गोष्टी सोडून देणे ही देखील एक चांगली सवय मावली जाते. अनेक जण जुन्या गोष्टी उगाळत बसतात. त्यातून खरे तर काही हाशील होत नसते. त्यात उगाच वेळच वाया जाण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे नवीन स्किल्स शिकून घेणे. कारण सतत शिकणारा माणूस कधीच अपयशी होत नाही.