• Download App
    पी. चिदंबरम इतिहास विसरले; लाला लजपतरायांना निधनानंरही नेहरूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या अधिवेशनात "उपस्थित ठेवले"!! Even after the demise of Lala Lajpat Rai, he was present at the Congress convention under the chairmanship of Nehru

    Congress : पी. चिदंबरम इतिहास विसरले; लाला लजपतरायांना निधनानंरही नेहरूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या अधिवेशनात “उपस्थित ठेवले”!!

    नाशिक: भाषणाच्या ओघात बडे बडे विद्वान नेते इतिहास विसरून नसलेले सत्य दडपून ठोकत असतात. असेच काहीसे भारताचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या बाबतीत झाले आहे. Even after the demise of Lala Lajpat Rai, he was present at the Congress convention under the chairmanship of Nehru

    पुण्यात काँग्रेसच्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी तरुणांना काँग्रेसने संधी दिली पाहिजे, असे सांगताना एका ऐतिहासिक असत्य दडपून ठोकून दिले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऐन चाळीशी मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला. त्यावेळी महात्मा गांधी आणि थोर नेते पंजाब केसरी लाला लाजपत राय हे जेष्ठ नेते व्यासपीठावर बसलेले होते. पण त्यांनी नेहरूंसारख्या त्यावेळच्या तरुण नेत्याला अध्यक्षपदाची संधी दिली, असे चिदंबरम म्हणाले. काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाची त्यांनी माहिती देखील दिली.

    त्यावेळी लाहोर अर्थातच अखंड भारताचा हिस्सा होते. 31 डिसेंबर 1929 रोजी काँग्रेस अधिवेशनात पंडित नेहरूंनी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला. बरोबर रात्री बारा वाजता रावी नदी किनारी स्वराज्याचा ध्वजही फडकवला होता. ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. पण त्यावेळी लाला लाजपत राय तिथे असणे शक्य नव्हते. कारण 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले होते. पण चिदंबरम यांनी उत्साहाच्या भरात त्यावेळी आधीच निधन झालेल्या लाला लजपतराय यांना पंडित जवाहरलाल नेहरू या तरुण अध्यक्षाच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस अधिवेशनात “उपस्थित ठेवले”…!!

    पंडित जवाहरलाल नेहरू जर 40 वर्षांची असताना अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनू शकतात, तर सध्याचे तरुण – तरुणी जिल्हा तालुका अथवा ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष का बनू शकत नाहीत??, असा सवाल त्यांनी केला. पण हा सवाल करताना निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेसच्या वरिष्ठांकडे म्हणजेच ज्येष्ठ नेत्यांकडेच आहेत, हे ते विसरले…!!

    Even after the demise of Lala Lajpat Rai, he was present at the Congress convention under the chairmanship of Nehru

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!