नाशिक : नात्यागोत्यांमध्ये वाटप केलेला पक्ष, पवारांची पलटी मारण्याविषयीची गॅरंटी; त्यामुळे राष्ट्रवादीची झाली गोची, आपल्याच गटाच्या नेत्यांना नेते घालत आहे भीती!! ,अशी वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे नेते आपापल्या गटातल्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फळीतल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकमेकांशी बिलकुल संबंध ठेवू नका. त्यामुळे जनतेमध्ये गैरसमज पसरतो, त्यामुळे आपापल्या गटांचे नुकसान होईल, हे आम्ही सहन करणार नाही, अशी भीती घालत आहेत. Embarrassment for both pawar factions, as their workers not ready to fight with each others
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक भाषणांमधून आता आम्ही पवार काका – पुतणे कधीही एकत्र येणार नाही. तुमच्या डोक्यातला “तो” समाज काढून टाका, की हे कधीतरी एकत्र येतील आणि आपली पंचाईत होईल, असे तुम्ही मानू नका. आम्ही खरंच वेगळे झालो आहोत. आता आम्ही एकत्र येणार नाही, असे अजितदादांना वारंवार सांगावे लागले. त्याच वेळी आपल्या कुठल्याही विरोधाकाकडे चहा प्यायला जाऊ नका. निवडणूक होईपर्यंत त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवू नका. तुमचे पाहुणे – रावळे, नातेगोत्यांचे संबंध निवडणुकीत बाजूला ठेवा. लोकांमध्ये आपण पूर्ण वेगळे झाल्याचाच संदेश पोहोचवा. आपल्याच राष्ट्रवादीचे आणि महायुतीचे काम करा. काम करण्याच्या अडचणी सांगताना कुठल्याही नात्यागोत्याची कारणे मी ऐकून घेणार नाही, अशी दमबाजी अजितदादांनी बारामती आणि पुण्यातल्या भाषणांमध्ये केली.
त्याचेच रिपीटेशन जयंत पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. तुमचे नातेवाईक, मित्र समोरच्या पक्षांमध्ये असले, तर ते तुमच्याकडे मुद्दामून चहा प्यायला येतील. लग्नकार्याची पत्रिका घेऊन येतील, पण तुमचे नातेसंबंध निवडणुकीच्या बाहेर ठेवा. निवडणुकीत त्याची सरमिसळ करू नका. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज वाढतो आणि आपले नुकसान होते. हे तुम्ही अजिबात घडू देऊ नका, अशी दमदाटी जयंत पाटलांनी केली.
अजित पवार काय किंवा जयंत पाटील काय या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना अशी दमबाजीची भाषा का वापरावी लागली??, त्याला कारणही तसेच बळकट आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाच समज अद्याप खोलवर रुजलेला आहे, की हे पवार काका – पुतणे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. हे मूळात वेगळे झालेलेच नाहीत. हे कधीतरी एकत्र येतील आणि आपण जर एकमेकांच्या विरोधात काम केले, तर आपलीच पुढे गोची होईल. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधले दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फळीतले कार्यकर्ते आणि नेते बिलकुलच एकमेकांविरोधात काम करायला तयार नाहीत. त्यांना पवारांच्या पलटी मारण्याची गॅरंटी आहे आणि त्या गॅरंटी मधूनच त्यांचे दोन्ही गटांमध्ये कार्यकर्ते स्वतःच्या राजकीय हितासाठी कोणतीही “रिस्क” घ्यायला तयार नाहीत.
पण त्यामुळेच राष्ट्रवादी आतून एकच आहे. काका – पुतण्यांचे भांडण वरवरचे आणि खोटे आहे. पवारांना कुठल्याही मार्गाने सत्ताच मिळवायची आहे. त्यासाठी ते कधीही पलटी मारू शकतात हे जनमानसात पुरते रुजले आणि रुतले आहे. ते काढून टाकण्याचे फार मोठे आव्हान अजितदादा आणि जयंत पाटलांसारख्या नेत्यांपुढे आहे. हे आव्हान पेलताना या नेत्यांची पुरती दमछाक होत आहे.
Embarrassment for both pawar factions, as their workers not ready to fight with each others
महत्वाच्या बातम्या
- ED नॅशनल हेराल्डची मालमत्ता जप्त करण्याची शक्यता, नोव्हेंबर 2023 मध्ये अटॅच केली होती 752 कोटींची प्रापर्टी
- स्टालिन अण्णांचा अहंकार उफाळला; म्हणाले, DMK संघटना पंतप्रधान, राष्ट्रपती बनवते; सरकारे घडवते – पाडते!!
- ‘आप’ला आणखी एक झटका, मंत्री राजकुमार आनंद यांनी दिला राजीनामा!
- इलॉन मस्क पहिल्यांदाच भारतात येणार, मोदींना भेटणार आणि मग करणार ‘ही’ मोठी घोषणा!