• Download App
    नात्यात फार काळ ताणू नकाDon't stretch the relationship too long

    लाईफ स्किल्स : नात्यात फार काळ ताणू नका

    प्रियाला लग्नानंतर एक नवाच शोध लागला. तिच्या काही गरजा किंवा आवडी-नावडी तिला कळायच्या आतच नीरजला- तिच्या नवऱ्याला- कळायच्या, तिच्यातल्या काही गुणांचा पत्ता तर त्यानं दाखवून देईपर्यंत तिला लागलाच नव्हता.Don’t stretch the relationship too long

    तिला जात्याच लय-तालाची गोडी होती, पण ती फार कधी लक्षातच आली नव्हती. संगीत ऐकताना आपोआप थिरकणारी तिची बोटं बघून नीरजलाच ते लक्षात आलं. त्याच्या प्रोत्साहनामुळं तिनं विशारदचा अभ्यास केला आणि चक्क पहिली आली. नीरजवरचा तिचा विश्वास अजून बळकट झाला.

    जिवलग नात्यांचा रोजच्या जगण्यामध्ये भरपूर विधायक उपयोग होऊ शकतो. पण केव्हा? जेव्हा एकमेकांबद्दलची पुरेशी समज, गाढ विश्वास, एकमेकांची काळजी घेणं, आवश्यक तिथे मदत करणं-घेणं, आणि नातं अबाधित राहण्यासाठीची निष्ठा पुरेशा प्रमाणात असते तेव्हा.

    एकमेकांना बघितल्यावर, भेटल्यावर मुद्दाम प्रयत्न न करता आपल्या चेहऱ्यावर जर प्रसन्नतेचा शिडकावा होत असेल तर ते नातं आपले आरोग्यवर्धक नातं आहे, असं खुशाल समजावं. अर्थातच अशी नाती ही मोजकीच राहणार हे उघड आहे. आणि म्हणून ती जपण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.

    निकटची नाती जपताना कुठल्या गोष्टी किती ताणायच्या आणि सल सोडायच्या ही खूप विचारपूर्वक, शांतपणे समजून घेण्याची गरज असते. हे ज्यांना समजते ते नात्यासाठी प्रसंगी एक पाउल मागे टाकण्यास घाबरत नाहीत. किंवा त्यात थोडाही कमीपणा मानत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेपेक्षा नाती सांभाळणे अधिक महत्वाचे वाटत असते. हे थोडंसं योगासनासारखं आहे. त्यात शरीराला लवचीक ठेवण्यासाठी ताण द्यावाच लागतो.

    जर अजिबात ताण दिला नाही तर शरीर टणक, आखडलेलं बनतं आणि अवास्तव ताणलं तर एखादी नस, स्नायू, अवयव कायमचा दुखावला जाऊ शकतो. नात्याचंही असंच आहे.

    Don’t stretch the relationship too long

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!