• Download App
    मृत्यूमुळे प्राणी दुःखी होतात का?।Does death make animals miserable?

    मृत्यूमुळे प्राणी दुःखी होतात का?

    प्राण्यांबाबत माहिती जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडते. अनेक जण आपल्या घरात कुत्रे, मांजर, पोपट असे प्राणी व पक्षी पाळतात. घरातील एक व्यक्ती असल्याचे मानून त्यांच्यावर प्रेम करतात. मात्र या वन्यप्राण्यांच्या अनेक सवयींची तसेच भावनांचा आपल्याला पुरेशी माहिती नसते. प्राण्यांची भाषा आपल्याला समजत नाही, त्यांच्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीही आपल्याला माहीती नसतात. समजा एखादा प्राणी जर मरण पावला तर अन्य आजूबाजूच्या प्राण्यांना किती दुःख होते. Does death make animals miserable?

    कळपातला एखादा हत्ती मरण पावला, तर हत्तींना खेद वाटतो का?, मांजरालाही दुसऱ्या मांजरीच्या मृत्यूचं दुःख होतं का?, मुळात प्राण्यांमध्ये दुःख ही भावना आपल्याला वाटते तशीच असते का?. माणसाला असे अनेकदा प्रश्न पडतात. इंग्लंडमधील बार्बरा जे. किंग यांनी यावर सखोल संशोधन केलं आणि त्यावर आधारित हाऊ अॅनिमल्स ग्रीव्ह हे पुस्तकही लिहिले. त्यांच्या मते अशा प्रकारे दुःख व्यक्त करणारा आणि भावनाप्रधान प्राणी हत्ती हा आहे. एका संशोधकानं एका हत्तीचं शव हत्तींचे कळप येत, जात असतात त्या मार्गावर ठेवले. त्या वाटेनं जाणारे हत्तींचे पाच कळप त्या शवापाशी थांबले. कोणी त्याभोवती फिरून, कोणी त्यावर सोंड फिरवून शोक प्रकट केला. जंगलातील माकडापासून पाळीव प्राण्यांपर्यंत सारेच प्राणी आपल्या साथीदाराच्या मृत्यूनंतर कोणत्या ना कोणत्या प्रकारे शोक व्यक्त करतात, असं त्यांनी या पुस्तकात सविस्तरपणे मांडले आहे. त्यांनी मांजरीचंदेखील उदाहरण दिलं आहे. त्यांनी बहिणी असलेल्या मांजरींविषयी या पुस्तकात लिहिलं आहे. त्यापैकी एका मांजरीचा मृत्यू झाला. त्यानंतर बराच काळ दुसरी मांजर पहिलीच्या शवापाशीच बसून किंवा रेंगाळत राहिली होती. असं असलं, तरी माणसाच्या भावना आणि प्राणी व्यक्त करत असलेल्या भावना यात फरक आहे.

    प्राण्यांमध्ये दुःख ही अतिशय प्राथमिक स्तरावरची भावना असते. माणसाप्रमाणे ते दुःख त्यांच्या मनामध्ये खूप काळ राहात नाही. त्यामुळे खरे तर माणसाने प्राण्यांपासून हे शिकण्यासारखे आहे. कोणतीही दुःखे मनात फार काळ न ठेवता आहे त्या परिस्थीतीला धीरोदात्तपणे सामोरे जाण्यातच जीवनाची खरे सार सामावलेले आहे. अधिक काळ दुःखात राहिल्याने घडलेली परिस्थीत बदलत नाही. त्यापेक्षा त्यातून बाहेर पडून पुढील काळजी योग्य त्या प्रकारे घेतल्यास जीवन अधिक आनंदी व सुखकर बनते. प्राणीही नेमके हेच करतात.

    Does death make animals miserable?

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!