• Download App
    परिस्थितीपुढे हार मानू नका। Do not give up in the face of circumstances

    परिस्थितीपुढे हार मानू नका

    तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर न कंटाळता, परीस्थितीमुळे न डगमगता तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. असे झाले तर यश मिळेलच. एखाद्या अपयशाने खचून न जाता चिकाटीने पुढे जाण्यामुळेच यश मिळणार हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. तुमची वेळ आणि मेहेनत द्यायची तयारी असेल तर यश कमवणे म्हणजे काही फार अवघड काम नाही. मात्र याबाबत असणारा तुमचा दृष्टीकोन फार महत्वाचा आहे. समोर असलेली संधी हेरण्यात तुम्ही यशस्वी झालात की झाले. मग शक्य असेल त्या चांगल्या मार्गाने, स्वकष्टाने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने यशाला गवसणी घालू शकता. Do not give up in the face of circumstances

    ते सुद्धा कसलंही टेन्शन न घेता! जसं आपल्याला गीतेत सांगितले आहे की कर्म करत रहा, फळाची अपेक्षा करू नका तेच आपण थोडं वेगळं करून अमलात आणायचं आहे. आपण फळाची अपेक्षा तर करायची आहे पण त्यावर लक्ष केंद्रीत न करता पूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करायचे आहे. समजा आपण एखादी वस्तू विकत असू तर आपण ती जास्त प्रमाणात विकली कशी जाईल यावर जास्त भर देत असतो किंवा समजा आपण एखाद्या कोचिंग क्लासेसचे मालक असू तर आपल्या क्लासमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील याचाच आपण विचार करत असतो.

    जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे कसे आकर्षित करता येईल हाच आपल्या मनात विचार असतो आणि त्या दृष्टीनेच आपले प्रयत्न असतात. पण इथेच आपलं गणित चुकत असतं. आपण फळावर जास्त लक्ष दिल्यामुळे आपल्या कामाकडे दुर्लक्ष होते आणि आपल्या वस्तूचा दर्जा घसरतो किंवा आपल्या क्लास मधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरतो आणि आपलं फळ सुद्धा आपल्यापासून दूर जाते. आपल्या कामावर लक्ष देऊन ते उत्तम केलं तर ग्राहक आपोआप आपल्या वस्तूकडे खेचला जाईल किंवा विद्यार्थ्यांना क्लास लावण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही. कुठलाही व्यवसाय असो व नोकरी आपल्याला यातून काय मिळणार यावर लक्ष केंद्रित केले कि संपले. तुम्ही तुमचे बेस्ट द्यायला सुरुवात करा पैशांचा ओघ आपोआप तुमच्याकडे वयात येईल.

    Do not give up in the face of circumstances

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!