• Download App
    Devendra fadnavis फडणवीसांच्या भरवशाचे नेते पवारांच्या दावणीला

    Devendra fadnavis : फडणवीसांच्या भरवशाचे नेते पवारांच्या दावणीला; घाटगे + हर्षवर्धन निघाले तुतारी फुंकायला!!

    नाशिक : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातले सर्वांत मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भरवशाचे दोन नेते शरद पवारांच्या दावणीला बांधले गेलेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलचे नेते समरजित घाटगे आणि पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर मधले नेते हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकायला निघाल्याची बातमी आहे. ही बातमी खरी असेल, तर देवेंद्र फडणवीस पुढची चाल कशी करणार??, याची उत्सुकता आता महाराष्ट्रात लागून राहिली आहे.

    त्या पलीकडे जाऊन आपल्या भरवशावर भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची समाधानकारक “राजकीय व्यवस्था” देवेंद्र फडणवीस लावू शकले नाहीत याची दबक्या आवाजात पक्षात आणि पक्षाबाहेर चर्चा सुरू झाल्याची बातमी आहे.

    महायुतीमध्ये अजित पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस घेतल्यानंतर महायुतीत सर्वाधिक कोंडी भाजपची झाल्याचे दिसून आले. कारण भाजपने स्वपक्षाचा विस्तार करताना बाकीच्या पक्षांमधून जे अनेक इच्छुक नेते पक्षात घेतले त्यांची “राजकीय व्यवस्था” लावण्याचे काम भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे होते, ते त्यांनी काही अंशी पूर्ण केले. परंतु बऱ्याच अंशी अपूर्ण ठेवले.


    Jammu Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी भाजपकडून राम माधव, जी.किशन रेड्डींवर विशेष जबाबदारी!


    समरजित घाटगे आणि हर्षवर्धन पाटील ही त्याची दोन मोठे उदाहरणे ठरली. हर्षवर्धन पाटलांना भाजपने राष्ट्रीय पातळीवरचे सहकार परिषदेचे अध्यक्षपद दिले. परंतु इंदापूर मधून आमदार व्हायचे आणि राज्याच्या मंत्रिमंडळात जायचे ही त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी इंदापूर मधल्या राजकीय समीकरणांमध्ये जर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे हेच महायुतीचे उमेदवार असतील, तर आपल्याला पवारांची पक्षाची तुतारी हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन तिकडे वळल्याचे दिसत आहे,

    समरजित घाटगे यांना थेट देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. अगदी महायुतीत अजित पवारांचा पक्ष घेतल्यानंतरही फडणवीसांनी तो शब्द कायम ठेवला असल्याचे त्यावेळी बोलले गेले होते. त्यावेळी समरजित घाटगे यांनी संयमाची भूमिका घेत भरपूर वाट पाहिली. परंतु महायुतीत हसन मुश्रीफ यांची राजकीय सोय लावण्याच्या दृष्टीने अजितदादांनी आधीपासूनच खेळी केली. त्यामुळे समरजित घाटगे यांना भाजपमध्ये राहून काही फायदा दिसला नाही. त्यापेक्षा अजितदादांच्या हसन मुश्रीफांविरोधात शरद पवारांच्या पक्षातून लढून आमदारकी पटकावण्याकडे त्यांचा कल दिसला. यातूनच हर्षवर्धन पाटील आणि समरजित घाटगे यांच्या पक्षाबदल करण्याच्या बातम्या समोर आल्या.

    क्षमता आणि विश्वासाविषयी शंका

    पण या सगळ्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. भाजपचा विस्तार करताना अन्य पक्षातले नेते घ्यायचे, पण त्यांच्या राजकीय व्यवस्था लावायच्या नाहीत किंवा त्या व्यवस्था लावताना कमी पडायचे असे होत राहिले, तर भाजपच्या विस्ताराला मर्यादा येतीलच, पण त्या पलीकडे जाऊन फडणवीसांसारख्या उभरत्या नेतृत्वाच्या क्षमतेविषयी आणि विश्वासार्हतेविषयी दाट शंका निर्माण होईल, अशी स्थिती महाराष्ट्र भाजपमध्ये येऊन ठेपली आहे.

    Devendra fadnavis trusted leaders to drifting away from him

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस