बौध्दिक विकासासाठी व कार्यक्षमता उत्तम राखण्यासाठी ज्ञान ग्रहण, ज्ञानाची साठवण व स्मरण अशा तीनही कामांसाठी गायीचे तूप श्रेष्ठ आहे. नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. मेंदू वर कार्य करणारी औषधे नाकाच्या मार्गे दिली तर त्यांचा परिणाम लवकर होतो. कारण ब्लड-ब्रेन बॅरियर यंत्रणे पासून मुक्त अशा सोप्या मार्गाने ही औषधे काम करतात. Cow’s ghee is important for knowledge acquisition, storage and remembrance
अलिकडे मधुमेहा साठी नाकाच्या मर्गे इन्सुलिन देण्याचे नवीन तंत्र प्रचलित होत आहे. ह्याच तत्वावर आधारित उपचार पध्दती आयुर्वेदात नस्य विधी म्हणून वर्णन सापडते. नाकाच्या मर्गाने टाकलेले औषध रक्तात शोषले जाण्यासाठी फक्त दीड मिनिटांचा अवधी पुरेसा होतो असे प्रयोगांती सिध्द झाले आहे. केशराचे वस्त्रगाळ चूर्ण शास्रशुध्द विधीने मूर्छित केलेल्या गायीच्या तुपामध्ये सिध्द करून हे तूप नियमितपणे नाकात चार चार थेंब टाकावे. यासाठी वेळ काढणे कठीण होत असेल तर आठवड्यातून दोन दिवस तरी हे तूप नाकात जरूर टाकावे. त्यामुळे नाका बरोबरच कान व डोळ्यांची पण शक्ती सुधारते, डोळ्याने वाचलेला व कानाने ऐकलेला विषय किंवा अभ्यास सहज पणे मेंदू पर्यंत विना-अडथळा पोचतो. बोटात अंगठी जात नसेल तर त्या ठिकाणी तेल किंवा दुसरा काही स्निग्ध पदार्थ लावला की ती क्रिया अगदी सहज होते. ह्या उपचारामुळे काही त्रास न होता नकळतपणे अनेक फायदे होऊ लागतात.
कोणाला वरच्या वर सर्दी होत असेल तर तो त्रास नाहिसा होतो, केस गळत असतील तर थांबून जातात, वाचून वाचून डोळ्यांना थकवा वाटत असेल तो थकवा गायब होतो, डोळ्यांची आग थांबते, कानात दडे बसत नाही, चष्म्याचा नंबर हळू हळू कमी होत जातो व कायम साठी जऊ पण शकतो, डोकेदुखीचा त्रास असल्यास तो पण आपोआपच ठीक होतो. हे नस्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्या नंतर करणे योग्य आहे. ह्या वेळी केल्याने अधिक फायदा होतो. नाकात थेंब टाकल्या नंतर ५ मिनिटे आडवे पडून राहावे. कधी कधी हे औषधी तूप घशात उतरल्या सारखे जाणवते. त्यावर घोटभर कोमट पाणी प्यावे.