आज जगभरातील लोक ख्रिसमस साजरा करत आहेत, परंतु आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगत आहोत जिथे ख्रिसमस सर्वात खास पद्धतीने साजरा केला जातो.
हा देश म्हणजे व्हॅटिकन सिटी . हा देश अनेक प्रकारे खास आहे, सर्वात वेगळा आहे.
उदाहरणार्थ, हा जगातील सर्वात लहान देश आहे. त्याचे क्षेत्रफळ फक्त 44 हेक्टर आहे. म्हणजेच याहूनही मोठे, भारतात छोटे छोटे मोहल्ले आहेत.
येथील संपूर्ण लोकसंख्या कॅथलिक आहे. एवढेच नाही तर पुरुषांसोबतच महिलांसाठीही ड्रेस कोड आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई: व्हॅटिकन सिटीत एकही दवाखाना नाही तर या देशात १९८३नंतर कुणाचा जन्मच झाला नाही .“एखाद्या देशाची लोकसंख्या ही ३ अंकी सुद्धा असू शकते” असं कोणी म्हटल्यावर आपण पटकन विश्वास ठेवणार नाही आपण राहतो त्या सोसायटी मध्ये आजकाल १००० लोकांपेक्षा जास्त लोक राहत असतात, पण जगात एक असा देश आहे त्याची लोकसंख्या ही ३ अंकी आहे आणि तरी त्या जागेला देश म्हणून मान्यता मिळाली आहे.
व्हॅटिकन सिटी – ख्रिश्चन धर्मियांची पंढरी…
ही तीच जागा आहे जिथून जगभरातील ख्रिश्चन धर्मीय लोकांना धर्मोपदेश दिला जातो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील सर्वात छोटा देश आहे. ३.२ किलोमीटर मध्ये संपून जाणाऱ्या या देशात केवळ ८५० लोक राहतात. इटली मधील सर्वात लांब तिबर नदीच्या तीरावर वसलेला हा देश अगदीच नयनरम्य आहे.
कॅथलिक चर्चचे धर्मगुरू पोप यांचं हे १३७७ पासून अधिकृत निवासस्थान आहे. स्थापनेपासून जवळपास ६०० वर्ष म्हणजे १९२९ पर्यंत हा देश एक स्वतंत्र राज्य होण्यासाठी सुद्धा संघर्ष करत होता. लॅटरन करार १९२९ मध्ये झाल्यानंतर ११ फेब्रुवारी १९२९ रोजी ‘व्हॅटिकन सिटी’ हे सर्वात पहिल्यांदा एक राज्य म्हणून घोषित करण्यात आलं.
हे साध्य करण्यासाठी तत्कालीन राजकीय नेते आणि पोप यांच्यात बराच वाद सुरू होता. त्या भागात कोण आपली सत्ता स्थापन करू शकेल किंवा राजकीय वर्चस्व सिद्ध करू शकेल याबद्दलचा हा वाद होता.
धर्मप्रसारण करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या या देशात लोक दाखल होत गेले आणि धर्मप्रचारक म्हणून ओळखले जाऊ लागले. तिथे राहणाऱ्या लोकसंख्येच्या ७५% लोक हे आजही धर्म प्रचारक म्हणून काम करतात.
जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या व्हॅटिकन सिटीला काही वर्षांपूर्वी पिटकैर्न बेटाने मागे टाकलं आहे. पिटकैर्न बेटाची लोकसंख्या ही केवळ ४० ते ६० लोक इतकी आहे. ‘ब्रिटिश टेरिटरी’ म्हणून ओळखली जाणारी ही जागा पेरू आणि न्यूझीलंड या देशांच्या मध्यभागी आहे. चार बेटांचा समूह असलेल्या या जागेत राहतात.
व्हॅटिकन सिटी ही अजून एका कारणासाठी लोकप्रिय आहे, ती म्हणजे तिथल्या संग्रहालयासाठी. UNESCO ने वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केलेल्या या संग्रहालयात दरवर्षी लाखो लोक भेट देत असतात. प्रत्येक वेळी भेट दिल्यावर तुम्हाला ते अजून चांगलं वाटतं अशी त्याची ख्याती आहे.
व्हॅटिकन सिटी मध्ये येण्यासाठी तुम्हाला वेगळा व्हिसा काढावा लागतो. तिथे राहणाऱ्या लोकांना वेगळा पासपोर्ट दिलेला असतो. या देशाचे वेगळे वाहन परवाने सुद्धा आहेत.
व्हॅटिकन सिटी ही एखाद्या मोठ्या राजवाड्यासारखी आहे. पोप हे फक्त कॅथलिक धर्मप्रसारक नसून ते त्या देशाचे राजे सुद्धा आहेत. या राजवाड्यात एकूण १४०० खोल्या आहेत. पोप यांचे ऑफिसेस आहेत.
रोम मधील सर्वात प्रेक्षणीय समजल्या जाणाऱ्या व्हॅटिकन सिटीला एकूण ५५१ पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून पर्यटक हे सर्वात उंच ठिकाणी जाऊ शकतात आणि तिथून पूर्ण शहराला बघू शकतात. सेंट पीटर स्क्वेअर हे सुद्धा आपल्याला या उंचीवरून दिसतं.
व्हॅटिकन सिटीत व्हॅटिकन बँक सुद्धा आहे आणि तिथे जगातील एकमेव ATM आहे जे की लॅटिन भाषेत आहे. व्हॅटिकन सिटीला आता त्यांची वेगळी आर्मी सुद्धा आहे. स्विस गार्ड नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आर्मी मध्ये १३५ लोक आहेत. त्यांना वेळोवेळी मॉडर्न मिल्ट्री ट्रेनिंग दिली जाते.
व्हॅटिकन सिटी ही पुस्तक प्रेमींसाठी पर्वणी आहे. इथे असलेल्या वाचनालयात जगातील सर्वोत्तम पुस्तकं उपलब्ध आहेत. हे वाचनालय हे व्हॅटिकन संग्रहालयाच्या अखत्यारीत येतं.
१४७५ मध्ये सहावे पोप यांनी स्थापन केलेल्या या वाचनालयात ११ लाख पेक्षा अधिक पुस्तकं आहेत. दरवर्षी त्यात सहा हजार पुस्तकाने भर पडत असते.