• Download App
    सतत जागा राहणारा तल्लख मेंदू। Brilliant brain that stays constantly awake

    सतत जागा राहणारा तल्लख मेंदू

    पूर्ण झोपेचं महत्त्व मेंदूवरील संशोधनातून आता सिद्ध झालेलं आहे. पूर्ण झोपेची गरज सगळ्यांनाच असते. झोप कमी झाली तर एकूणच हालचालींवर परिणाम होतो. कारण मुळात मेंदूच्या एकाग्रतेवर परिणाम झालेला असतो. जिम हॉर्न आणि युवेन हॅरिसन या मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केला. त्यात एका गटाला जागरण करायला लावलं व काही प्रश्न विचारले. तेव्हा आढळून आलं की सर्जनशील विचार, निर्णयक्षमता आणि मिळालेली नवी माहिती स्वीकारणं यात अडचणी आल्या. पूर्ण झोप ही मानसिक आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. कारण झोपेतदेखील मेंदूचं काम थांबत नाही. ते चालूच असतं.
    उलट झोपेच्या अवस्थेत मेंदूत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असतात. Brilliant brain that stays constantly awake

    या घडामोडी शिक्षणाला मदत करत असतात, असे संशोधन पिअरे मॅक्वेट यांनी लंडन विद्यापीठात केले आहे. आधुनिक मेंदूसंशोधनातून असं दाखवता येतं की प्रत्येक कृती करण्यासाठी मेंदूत एक विशिष्ट कार्यक्षेत्र असतं. भाषा आकलनाचं काम एका क्षेत्रात चालतं, तर गणिताचं काम एका क्षेत्रात चालतं. सर्जनशील कृतीचं कार्यक्षेत्र वेगळंच असतं, तर भावभावनांशी संबंधित अनुभव वेगळ्या क्षेत्रात सांभाळले जातात. या प्रयोगात त्यांनी एका गटाला अतिशय गुंतागुंतीचं प्रशिक्षण देऊ केलं. हा गट दिवसभर त्याच कामात गुंतला होता. हे सर्व जेव्हा रात्री झोपले, तेव्हा त्यांनी त्यांच्या मेंदूचं स्कॅनिंग केलं. संशोधनात असं आढळलं की दिवसभर केलेलं काम मेंदूच्या ज्या कार्यक्षेत्रात घडलं होतं, तीच क्षेत्रं झोपेतही उद्दिपित होती. याचा अर्थ असा की दिवसभर जी माहिती मेंदूला मिळाली होती, त्यावर शांतपणे काम चालू होतं.

    पूर्ण झोपेनंतर दुसऱ्या दिवशी या सर्व गटाचा उत्साह टिकलेला होता. त्यांना आदल्या दिवशीचं सर्व लक्षात होतं. झोपेच्या काळात, जे काही शिकलं आहे, त्यावर प्रक्रिया झालेली असते. त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीही चांगली असते. चांगलं शिकायचं तर त्यासाठी झोपही चांगली हवीच. मेंदू हा सतत जागं राहून आपली कामं चोख पार पाडणारा अवयव. या मेंदूला विश्रांतीची गरज असते. तशीच त्याला चलाख, तरतरीत ठेवण्याचीही गरज असते. त्यासाठी झोपेसारखी मेंदूपूरक कृती अवश्य नीटपणे केली पाहिजे.

    Brilliant brain that stays constantly awake

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!