• Download App
    मेंदूचा शोध व बोध : स्वतःला तरुण ठेवण्याचा, बुद्धी तल्लख ठेवण्याचा उत्तम मार्ग । Brain Discovery and Enlightenment: The best way to keep yourself young, to keep your intellect brilliant

    मेंदूचा शोध व बोध : स्वतःला तरुण ठेवण्याचा, बुद्धी तल्लख ठेवण्याचा उत्तम मार्ग

    मन हे खूप चंचल असते. ते कायम भूतकाळातील घटनांचा किंवा भविष्यातील चिंतेचा विचार करीत असते. याच्या फायद्या तोट्यावर आता फार मोठ्या प्रमाणात संशोधन जगात सुरु आहे. त्यातील निष्कर्ष धक्कादायक आहेत. वर्तमानकाळात न राहता मन स्वैरपणे भूतकाळ आणि भविष्यकाळात भटकत असेल तर त्यामुळे त्या व्यक्तीची वृद्धत्वाकडे वाटचाल अत्यंत जलद गतीने होते. डीएनएच्या दोन्ही टोकाला टेलोमिअर्सच्या जोडया असतात. डीएनएमध्ये असलेल्या क्रोमोसोम्सची सुरक्षा करण्याचे काम टेलोमिअर्स करतात. पेशी आणि शरीराचे वय ओळखण्यासाठी टेलोमिअर्सचा वापर करण्यात येतो. Brain Discovery and Enlightenment: The best way to keep yourself young, to keep your intellect brilliant

    वाढणाऱ्या वयानुसार तसेच शारीरिक आणि मानसिक ताणतणावामुळे टेलोमिअर्सचा आकार कमी कमी होत जातो. ज्या व्यक्ती वर्तमानकाळातील गोष्टी करण्यात रमतात त्यांच्या टेलोमिअर्स लांब असतात तर ज्या व्यक्तींची मने स्वैरपणे भूतकाळ आणि भविष्यकाळात रमलेली असतात, वास्तवात रमत नाहीत अशा व्यक्तींचे टेलिमिअर्स छोटे असल्याचे कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधनांना आढळले. मनाच्या भटकण्यामुळे टेलोमिअर्स लांबी कमी होते किंवा टेलोमिअर्सचा आकार कमी असल्यामुळे मनाचे भटकणे वाढते किंवा या गोष्टी होण्याला तिसरी एखादी गोष्ट कारणीभूत आहे का, हे मात्र, संशोधकांना अद्याप समजलेले नाही. मात्र वर्तमानकाळात रमणा-या व्यक्तींचे टेलोमिअर्सआकाराने मोठे तर भूतकाळ आणि भविष्यकाळात रमणा-या व्यक्तींचे टेलोमिअर्स आकाराने कमी आढळले.

    या आधीच्या संशोधनात तणाव आणि नैराश्यामुळे टेलोमिअर्सचा आकार कमी होतो असे आढळले होते. मनाचे भटकणे कमी केल्यामुळे त्याचा परिणाम पेशी अधिक आरोग्यदायी होण्यावर होतो का, की हा बदल व्यक्तिमत्त्वातील गुणधर्मामुळे घडून येतो हा आता यातील संशोधनाचा पुढील टप्पा असणार आहे. त्यातून नवी माहिती उजेडात येईल. मात्र सध्याच्या माहितीनुसार तुम्ही जितके वर्तमानकाळात जगात तितके तरुण रहाल हे मात्र नक्की. मन चंगा तो कटोती मे गंगा अशी एक म्हण आहे. मनात नेहमी चांगले विचार असावेत, सदैव वर्तमानकाळात जगावे, लहान मुल जसे केवळ आत्ताचा विचार करुन जगत असते त्याप्रमाणे जीवन जगावे.

    Brain Discovery and Enlightenment : The best way to keep yourself young, to keep your intellect brilliant

    Related posts

    Pahalgam attack : एकीकडे काँग्रेसचा मोदी सरकारला पाठिंब्याचा दावा; दुसरीकडे सरकारच्या आक्रमक रणनीतीत खोडा घालायचा कावा!!

    Pahalgam attack : चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची; पण प्रत्यक्षात कृती पाकिस्तानला चिथावणी‌ द्यायचीच!!

    Pahalgam attack : फाका मारलेल्या सिद्धरामय्या + वडेट्टीवार यांच्यापासून काँग्रेसने झटकले हात; पण राहुल + सोनियांच्या संशयास्पद कृतींचे काय??