• Download App
    कृतघ्न उद्धव ठाकरेंची विनाशकाले विपरीत बुद्धी... Blunder by Uddhav Thackeray, who maligned RSS Bhgawa flag

    कृतघ्न उद्धव ठाकरेंची विनाशकाले विपरीत बुद्धी…

    भाजप आणि मोदी विरोधाच्या नशेत धुंद असलेल्या उद्धव ठाकरे यांना या गोष्टीचा विसर पडला आहे की मुळात शिवसेनेची राज्यव्यापी वाढ होण्याचा पाया हिंदुत्व स्वीकारल्यामुळे झाला आणि ते हिंदुत्व त्यांनी संघामुळे स्वीकारले होते. त्या संघाच्या ध्वजाला, पवित्र भगव्याला ‘फडकं’ म्हणून त्यांनी खूप मोठी चूक केली आहे… Blunder by Uddhav Thackeray, who maligned RSS Bhgawa flag


    संघ परिवाराचा राजकीय चेहेरा असलेल्या भारतीय जनसंघाने महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेच्या तीन निवडणुका लढवल्या आणि त्यात परिस्थिती काय होती बघा..

    १९६२ ० सीट
    १९६७ ४ सीट्स
    १९७२. ५ सीट्स

    जनसंघाचा आधुनिक अवतार भाजप १९८० साली जन्माला आला. त्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत त्याने १४ सीट्स जिंकून डबल फिगर गाठली. इंदिराजींच्या हत्येनंतर १९८५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत १६ सीट्स जिंकल्या.भाजपसाठी महाराष्ट्रात सत्ता मिळवणे ही अशक्य कोटीतील गोष्ट वाटत होती.पण दहा वर्षातच महाराष्ट्रात युतीचे सरकार आले हा चमत्कार कसा घडला ?

    ही विस्तृत उजळणी केली कारण त्याशिवाय भाजपच्या महाराष्ट्रातील यशात हिंदुत्वाचे योगदान स्पष्ट होणार नाही.

    या पार्श्वभूमीवर १९८७ साली विलेपार्ले मतदारसंघाची पोटनिवडणूक महत्वाची आहे. त्या निवडणुकीला देशाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेलेली ही पहिली निवडणूक.या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर जनता दलाशी युती असल्याने भाजपला शिवसेनेविरोधात लढावे लागले होते.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थन शिवसेनेला मिळाले तरच निवडणुकीत यश प्राप्त होईल याची जाणीव बाळासाहेब होती. या संदर्भात त्यांनी सरसंघाचालक बाळासाहेब देवरस यांची विलेपार्ले येथे भेट घेतली होती आणि संघाची मदत मागितली होती.

    हिंदुत्वासाठी लढणार असाल तर संघ पाठिंबा देईल अशी अट सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना घातली. बाळासाहेबांनी ती मान्य केली. संघाने आपले संघटन मैदानात उतरवले. शिवसेनेचे डॉ रमेश प्रभू विजयी झाले. या निवडणुकीत संघ आणि भाजप यांची तोंडे विरुद्ध दिशेला होती.

    दोन वर्षातच १९८९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अधिकृत युती जाहीर झाली. रामजन्मभूमी आंदोलन तापले असल्यामुळे हिंदुत्वाचा गजर महाराष्ट्रातही झाला आणि युती झाल्यापासून सहाव्या वर्षी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली.

    भाजप आणि मोदी विरोधाच्या नशेत धुंद असलेल्या उद्धव ठाकरे यांना या गोष्टीचा विसर पडला आहे की मुळात शिवसेनेची राज्यव्यापी वाढ होण्याचा पाया हिंदुत्व स्वीकारल्यामुळे झाला आणि ते हिंदुत्व त्यांनी संघामुळे स्वीकारले होते.

    त्या संघाच्या ध्वजाला, पवित्र भगव्याला ‘फडकं’ म्हणून त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. हिंदुत्ववादाचा विश्वासघात तर केला आहेच परंतु देशातील सर्वात मोठ्या हिंदुत्ववादी संघटनेची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपमानास्पद अवहेलना केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा कृतघ्न नेता महाराष्ट्राने कधी पाहिला नाही.त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे.

    विलेपार्ले पोटनिवडणुकीतील निकालाचा “वो दिन याद करो” असे उद्धव ठाकरे यांना सांगावेसे वाटते परंतु “विनाशकाले विपरीत बुद्धी”.. दुसरं काय ..

    आनंद देवधर,
    मुंबई

    Blunder by Uddhav Thackeray, who maligned RSS Bhgawa flag

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!