• Download App
    अल्पसंख्यांकांच्या हक्कावरून लोकसभेची निवडणूक कंडोम वापरावर आली, 1977 च्या निवडणुकीची आठवण झाली!! Asaduddin Owisi claimed Muslims use most condoms to control the population

    अल्पसंख्यांकांच्या हक्कावरून लोकसभेची निवडणूक कंडोम वापरावर आली, 1977 च्या निवडणुकीची आठवण झाली!!

    अल्पसंख्यांकांच्या हक्कावरून लोकसभेची निवडणूक कंडोम वापरावर आली आणि 1977 च्या निवडणुकीची आठवण झाली!! Asaduddin Owisi claimed Muslims use most condoms to control the population

    2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण होऊन बहुसंख्यांक विरुद्ध अल्पसंख्यांक असा रंग त्याला येऊ लागला. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा जाहीरनामा पुरता “एक्सपोज” केला. त्याआधी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचा हवाला दिला. 2006 मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय विकास परिषदेत मनमोहन सिंग यांनी देशातल्या सर्व संसाधनांवर अल्पसंख्याकांचा विशेषत: मुस्लिमांचा पहिला अधिकार असल्याचे वक्तव्य केले होते. तेच आता काँग्रेसला राजकीय दृष्ट्या छळते आहे. त्यातही काँग्रेसने जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना, संपत्तीचे फेरवाटप वगैरे मुद्दे उपस्थित करून देशात धार्मिक ध्रुवीकरणाला चालना दिली. त्यातूनच मोदींची काँग्रेस वरची प्रखर उद्भवली.

    काँग्रेस देशातल्या माता भगिनींचे मंगळसूत्र हिरावून घेऊन, त्यांची संपत्ती हिरावून घेऊन ती देशातल्या ज्यादा मुले पैदा करणाऱ्या घुसखोरांना वाटणार आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेस नेते भडकलेच, पण त्याहीपेक्षा AIMIM पक्षाचे नेते असे असदुद्दीन ओवैसी जास्त भडकले. एक तर त्यांना कधी नव्हे, ते हैदराबाद मतदारसंघात माधवी लतांच्या रूपाने “तगडे” आव्हान मिळाले आहे. 600000 बोगस मतदार निवडणूक आयोगाने हैदराबाद मधून हटविल्याने त्यामुळे ते आधीच अस्वस्थ झाले आहेत. आता आपली हैदराबादची सीट वाचत नाही याची जाणीव त्यांना झाल्यावर त्यांनी देखील काँग्रेसच्याच पावलावर पाऊल टाकून धार्मिक ध्रुवीकरणाला चालना दिली आणि मोदींना टार्गेट करताना मुसलमान जास्त कंडोम वापरतात, अशी मखलाशी केली.

    मुसलमानांची लोकसंख्या देशात वाढत नाही. मुस्लिम महिलांचा फर्टिलिटी रेट कमी झाला आहे. मुसलमान कधीही भारतात बहुसंख्यांक होऊ शकणार नाहीत. एका विशिष्ट टप्प्यावर गेल्यावर भारताची लोकसंख्या स्थिर होईल आणि त्यानंतर तिची घसरण होईल, असा मोदी सरकारचा अहवाल असल्याचा दावा ओवैसी यांनी केला. पण मोदी सरकारने नेमका असा कोणता अहवाल प्रसिद्ध केला??, याविषयी ओवैसी मूग गिळून गप्प बसले. पण त्यावेळी त्यांनी मुसलमानच देशात सर्वाधिक कंडोम वापरतात, अशी मखलाशी केली. ही हसण्याची बाब नाही ही वस्तुस्थिती असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळेच 1977 च्या निवडणुकीची आठवण जागी झाली.



    संजय गांधींचे पुरुष नसबंदीचे फॅड

    1977 च्या निवडणुकीपूर्वी इंदिरा गांधींनी लाभलेल्या आणीबाणीत संजय गांधी आणि त्यांच्या टीमने नसबंदीचे फॅड काढले होते. देशात लोकसंख्या खूप वाढली आहे. त्यामुळे पुरुषांनी नसबंदी करून घेतली पाहिजे, असे म्हणत जवळपास संजय गांधींनी देशावर नसबंदी लादली होती. दिल्लीच्या तुर्कमान गेट परिसरात शेकडो कॅम्प लावून संजय गांधींनी आणि त्यांच्या टीमने विशेषत: रुखसाना सुलताना या संजय गांधींच्या मैत्रिणीने पुरुषांच्या नसबंदीचे रेकॉर्ड केले होते.

    त्यावेळी आणीबाणी असल्याने संजय गांधींच्या नसबंदी प्रोग्रामला उघडपणे कुणी विरोध करू शकले नाही, पण 1977 च्या निवडणुकीमध्ये मात्र संजय गांधींचा नसबंदी प्रोग्राम काँग्रेसवरच उलटला आणि अक्षरशः काँग्रेसची “राजकीय नसबंदी” झाली. इंदिरा गांधी आणि संजय गांधी हे दोघेही नेते पडले. काँग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली. संजय गांधींच्या या नसबंदी प्रोग्रामचा काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आणि काँग्रेसने त्यातून चांगलाच धडा घेतला, पण परिणामी काँग्रेसचे मुस्लिम दृष्टीकरण वाढत गेले आणि ते आता थेट संपत्तीच्या फेरवाटपा पर्यंत येऊन ठेपले आहे.

    त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा मुद्दा जाहीरपणे उपस्थित केला आणि काँग्रेसचे मुस्लिम तुष्टीकरण “एक्सपोज” केले. पण त्याला प्रत्युत्तर देताना असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र मुस्लिमच जास्त कंडोम वापरतात, अशी मखलाशी करून त्या मुद्द्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला, पण ओवेसींच्या वक्तव्यामुळे 1977 ची निवडणूक आठवली. आता त्यांच्या वक्तव्याचा 1977 सारखाच परिणाम होऊन पुन्हा काँग्रेसला फटका बसणार की अन्य काही निकाल लागणार??, यासाठी 4 जून 2024 या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे!!

    Asaduddin Owisi claimed Muslims use most condoms to control the population

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य