• Download App
    "राष्ट्रीय महत्त्वाकांक्षी" ममता - केसीआर - उद्धव - पवार यांना मागे टाकत अरविंद केजरीवाल जनमताच्या बळावर "राष्ट्रीय आघाडीवर"...!! । Arvind Kejriwal on "National Front" on the strength of public opinion, overtaking "National Ambitious" Mamata - KCR - Uddhav - Pawar ... !!

    “राष्ट्रीय महत्त्वाकांक्षी” ममता – केसीआर – उद्धव – पवार यांना मागे टाकत अरविंद केजरीवाल जनमताच्या बळावर “राष्ट्रीय आघाडीवर”…!!

    पंजाब मध्ये आम आदमी पार्टीच्या विजयाने एक बाब सिद्ध झाली आहे, ती म्हणजे संपूर्ण देशात जेवढे म्हणून प्रादेशिक पक्षांचे महत्त्वाकांक्षी नेते आहेत त्या सर्व नेत्यांना मागे टाकत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनमताच्या बळावर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय आघाडीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे…!! Arvind Kejriwal on “National Front” on the strength of public opinion, overtaking “National Ambitious” Mamata – KCR – Uddhav – Pawar … !!

    ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, उद्धव ठाकरे एम. के. स्टालिन, हेमंत सोरेन या बडबोल्या मुख्यमंत्र्यांच्या कितीतरी पुढे अरविंद केजरीवाल जनमताच्या बळावर निघून गेले आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी स्वबळावर सत्ता आणून दाखवलीच, पण दिल्ली खेरीज त्यापेक्षा मोठे राज्य पंजाब मध्ये केजरीवालांनी झाडूचा करिष्मा चालवला आहे.

    बाकीचे नेते एकमेकांना भेटून राष्ट्रीय आघाडीच्या पत्रकार परिषद घेत असताना प्रत्यक्षात मात्र आपापल्या राज्यांमध्ये राजकारण साध्य करण्यात हे सगळे नेते मश्गुल राहिले. अरविंद केजरीवालांनी केव्हाही राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याच्या बाता पत्रकार परिषदांमध्ये मारल्या नाहीत किंवा तोंडी बोलून महत्त्वाकांक्षा जाहीर केली नाही. पण केजरीवालांनी आम आदमी पार्टीचा झाडू पंजाब मध्ये चालवून दाखवला. ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर भाजप वर तोंडी तोफा जरुर डागत होत्या. पण प्रत्यक्षात काँग्रेस फोडताना दिसत होत्या. आसाम, मणिपूर, गोवा या राज्यांमध्ये त्यांनी काँग्रेस फोडली उत्तर प्रदेशात जाऊन त्यांनी समाजवादी पक्षाचा प्रचार केला. महाराष्ट्रात येऊन त्या शरद पवारांना भेटल्या.



    त्यानंतर केसीआर चंद्रशेखर राव यांनी देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. झारखंड मध्ये जाऊन हेमंत सोरेन यांना भेटले. या दोघांनीही राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाकांक्षा पत्रकार परिषदांमध्ये जाहीर केल्या. पण प्रत्यक्षात जनमताचा करून कोणत्याही राज्यात जाऊन मिळवण्याची त्यांची राजकीय क्षमता दाखवता आली नाही. ती क्षमता फक्त आणि फक्त अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या निवडणुकीत दाखवली आहे.

    बाकीचे सोडा निदान ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, एम. के. स्टालिन यांचे आपापल्या बंगाल, तेलंगण, तामिळनाडूत 100% टक्के राजकीय वर्चस्व तरी आहे. पण उद्धव ठाकरे आणि गेल्या 39 वर्षांपासून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पत्रकारांनी ठेवलेले शरद पवार यांचे वर्चस्व महाराष्ट्र पक्ष म्हणून 50 % देखील नाही. ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी यांना महाराष्ट्र स्वबळावर कधीही सत्ता आणता आलेली नाही. आज देखील जुगाडू राजकारणातून त्यांची महाराष्ट्रात सत्ता आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रवक्त्यांनी कायम पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षा पत्रकार परिषदांमध्ये बोलून दाखवल्या आहेत. त्यांना जनमताच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर सोडाच दुसऱ्या राज्यांमध्येही यश मिळवता आलेले नाही.

    या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांचे राष्ट्रीय पातळीवर जनमताच्या बळावर दमदार पाऊल पडल्याचे मान्य करावे लागेल. पंजाब मध्ये आम आदमी पार्टीची बल्ले बल्ले, भगवंत मान कसे यशस्वी ठरले. याची वर्णने सध्या मीडिया करतो आहे पण त्यापलीकडे जाऊन पंजाबच्या निवडणुकीच्या निमित्ताने अरविंद केजरीवाल यांनी जनमताच्या बळावर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय आघाडी साठी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. हे मात्र कोणी सांगताना दिसत नाही.

    Arvind Kejriwal on “National Front” on the strength of public opinion, overtaking “National Ambitious” Mamata – KCR – Uddhav – Pawar … !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!