• Download App
    चीन मध्ये असंतोषाचा उद्रेक...An outbreak of discontent in China

    चीन मध्ये असंतोषाचा उद्रेक…

    नैसर्गिक प्रेरणा दाबून ठेवणारी डावी विचारसरणी अंगिकारल्याने चीनी जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला आणि जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कणभरही पर्वा न करणारी चीन मधील हुकूमशाही मूळे त्याला व्यक्त होण्याची संधी मिळाली नाही. १९८९ मधे तियानामेन चौकात तो काही अंशी समोर आला पण चीनी सरकारने अमानुषपणे तो चिरडून टाकला. An outbreak of discontent in China

    चीन मध्ये करोनाची तीन वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान रोगाचा संसर्ग पसरू नये म्हणून चीनी सरकारने अत्यंत अमानवी पध्दतीने उपाय योजना केल्या. माणसे मरत होती. तडफडत होती. उद्रेक वाढत चालला होता. पण व्यक्त झाला नाही.

    फाॅक्सकाॅनच्या एका कारखान्यात संसर्ग पसरला म्हणून संपूर्ण कारखाना बंद करून कामगारांना आतच कोंडण्यात आले. आतमधील परिस्थिती अत्यंत वाईट झाली. अन्नाची कमतरता, स्वच्छतेचा अभाव, उपचारांची कमी….. याचा परिणाम म्हणून काही कामगार मरण पावले. नंतर तीथे आग लागली (का लावली?). मग उद्रेक वाढला.

    चीनी सरकारने नेहमीच्या अमानुष पध्दतीने तो दाबायचा प्रयत्न केला पण जनतेच्या आंदोलनाच्या बातम्या प्रसारमाध्यमातुन पसरल्या. उद्रेक पसरत गेला…..

    सध्या अनेक विद्यापिठांतून विद्यार्थी निदर्शने करत आहेत. कामगार, जनता रस्त्यांवर उतरली आहे… चीन अस्वस्थ आहे.



    स्वतः ला तीसर्‍यांदा अध्यक्ष बनविण्यासाठी जिनपिंग यांनी नियमांत बदल केला. ती गोष्ट पसंत नसल्याने CPC च्या काही वरिष्ठांच्या मदतीनेच हा उद्रेक पसरत असावा असा माझा अंदाज आहे. एरवी एकही बातमी सरकारच्या परवानगीशिवाय बाहेर येत नसताना आंदोलनाचे व्हिडिओ बाहेर आलेच कसे?

    असो. कामगारांची अमानुष पिळवणूक करून धंदा करणार्‍या चीनचे वाटोळे जितके लवकर होईल तेवढे चांगले. आधुनिक जगात हुकूमशाही नाही तर लोकशाहीच असायला हवी.

    गेली ५-७ वर्षे चीनचा फुगा कधी फुटतो, याची जग वाट बघत आहे. तो फुटला तर मोठा फायदा भारताचा आणि जगातील लोकशाहीचाच होणार आहे. शिवाय आपल्याला स्वस्तात माल मिळतो म्हणून चीनी सरकारच्या अमानवी वागण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्वार्थी पश्चिमेलाही चांगलाच धडा मिळणार आहे.

    जगात नवी व्यवस्था बनायला सुरूवात झाली आहे. आणि भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे! भारताचा सुवर्णकाळ येतो आहे!

    (सौजन्य: फेसबुक)

    An outbreak of discontent in China

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य