• Download App
    ताटातलं वाटीत भेटींना जोर; गुलाबी जॅकेटच्या ब्रँडिंगला छेद!! Ajit pawar trying to make over his NCP, but his partymen are reaching out to sharad pawar

    ताटातलं वाटीत भेटींना जोर; गुलाबी जॅकेटच्या ब्रँडिंगला छेद!!

    नाशिक : येतंय फक्त तर ताटातलं वाटीत, पण या ताटातलं वाटीत भेटींनाच जोर चढला असून त्यामुळे गुलाबी जॅकेटच्या ब्रँडिंगला छेद जात असल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. एकीकडे अजित पवार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रँडिंग करण्याच्या मागे लागले आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षाचा गुलाबी रंग आपल्या जॅकेट पासून पोस्टर आणि मंडपापर्यंत सगळीकडे वापरून महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे, पण दुसरीकडे ताटातलं वाटीत भेटींनाच जोर चढला आहे. Ajit pawar trying to make over his NCP, but his partymen are reaching out to sharad pawar

    नगर जिल्ह्यातल्या अकोल्यातून माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड हे भाजपमधून पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येणार अशा जोरदार चर्चा मराठी माध्यमांनी रंगविल्या. शरद पवार यांचा अकोल्यात शेतकरी मेळावा देखील झाला, पण पिचड पिता पुत्र या मेळाव्याकडे फिरकले नाहीत. आम्ही भाजपमध्ये रमलो आहोत, असे उत्तर देऊन वैभव पिचड यांनी माध्यमांच्या बातम्यांची हवा काढली. त्यामुळे शरद पवारांचा मेळावा आमदार डॉ. किरण लहमटे यांच्याविरुद्ध तोंडसुख घेण्यापुरताच शिल्लक राहिला.

    पण त्या पलीकडे जाऊन ताटातलं वाटीत अशा दोन भेटी मात्र घडून आल्या. विजयसिंह मोहिते पाटील माजी आमदार राजन पाटलांच्या घरी गेले तर आमदार अमोल बेनके शरद पवारांना भेटून आले. माढ्यातून धवलसिंह मोहिते पाटलांनी विजय मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने विजयसिंह मोहिते पाटलांनी माजी आमदार राजन पाटलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली राजन पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत तरीदेखील त्यांनी आपल्याला मदत केल्याचे विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले. त्यामुळे आपण कौटुंबिक भेटीसाठी राजन पाटलांच्या घरी आलो अशी पुस्ती त्यांनी जोडली. राजन पाटलांनी हार शाल श्रीफळ देऊन विजयसिंह मोहिते पाटलांचा सत्कार केला.

    दुसरीकडे आमदार अतुल बेनके शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत पोहोचले. कदाचित विधानसभा निवडणुकीत साहेब आणि दादा एकत्र येतील, असे भाकीत अतुल बेनके यांनी वर्तवून महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपाचे संकेत दिले. अजितदादांचे राष्ट्रवादी महायुती म्हणून निवडणूक लढवेल पण जागा वाटपात काय होईल माहिती नाही. त्यामुळे भविष्यात कदाचित साहेब आणि दादा एकत्र येतील असा दावा अतुल बेनके यांनी केला. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आम्हाला मदत केली, ते आमचे, असे उद्गार शरद पवारांनी काढले, तर अनेक आमदार माजी पण भेट घेतात त्यामुळे अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली तर काय बिघडलं??, असा उलटा सवाला अजितदादांनी केला.

    अजितदादांनी पवार बेनके भेटीला कॅज्युअली उडवून लावले तरी या ताटातलं वाटीत भेटीगाठींमुळे अजितदादा आपल्या पक्षाचे करीत असलेल्या गुलाबी ब्रँडिंगलाच छेद गेला. जर आपले आमदार आणि नेते असेच शरद पवारांकडे जात राहिले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबी ब्रँडिंग अजितदादा नेमके काय करणार आणि त्यातून काय साध्य होणार??, असा सवाल त्यामुळे उत्पन्न झाला.

    शरद पवारांच्या पक्षात देखील फार मोठी नवी भरती होताना दिसत नाही. उलट त्यांनी ज्या 3 तरुणांच्या उमेदवारा जाहीर केल्या, ते राजकीय घरातलेच पवारांचे निष्ठावंतांचे वारसदार आहेत. त्यामुळे आधी अजितदादांच्या राष्ट्रवादीत पवारांचे आमदार सत्तेच्या वळचणीला निघून गेले आणि आता परत येत आहेत, ते देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीतले आमदार किंवा कार्यकर्ते, नेते परत येत आहेत. त्यामुळे पवारांच्या बाबतीत ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात एवढ्याच घडामोडी घडत आहेत. फक्त “पवार बुद्धी”ची मराठी माध्यम या बातम्या फुगवून आणि रंगवून सांगत आहेत.

    Ajit pawar trying to make over his NCP, but his partymen are reaching out to sharad pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस