नाशिक : हरियाणा विधानसभेत झालेल्या सलग तिसऱ्या विजयानंतर घेतलेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 99 जागा कशा मिळाल्या??, काँग्रेस मित्र पक्षांची कशी वागते??, वगैरे बाबींचा ऊहापोह त्यांनी केला. काँग्रेसला लोकसभेत मिळालेल्या निम्म्यापेक्षा जास्त जागा मित्र पक्षांच्या बळावर मिळाल्या. मित्रपक्ष नसते, तर काँग्रेसला आत्ताचा आकडा गाठताच आला नसता, असे मोदी म्हणाले. त्याचवेळी मोदींनी काँग्रेस मित्र पक्षांना गिळून टाकते. त्यांना संपवून टाकते, असा घणाघाती हल्लाबोल केला.
पण काँग्रेसवर केवळ पंतप्रधान मोदींनीच हल्लाबोल केला असे नाही, तर इंडिया आघाडीतल्या मित्र पक्षांनी देखील काँग्रेसला चिमटे काढायची संधी सोडली नाही. उद्धव ठाकरेंनी सामनातून काँग्रेसला उपदेशाचे फटके हाणले. आम आदमी पार्टीने काँग्रेसला “अहंकारी” म्हणून घेतले.
पण त्या पलीकडे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस त्याच्या मित्र पक्षांना गिळंकृत करते, हा जो हल्ला चढविला, त्याबाबतची नेमकी वस्तुस्थिती काय आहे?? वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये निर्माण झालेल्या काँग्रेसची आणि मूळ काँग्रेसची स्थिती काय आहे??, यावर थोडी नजर टाकली, तर वेगळीच वस्तुस्थिती समोर येते.
पश्चिम बंगाल मधली तृणमूळ काँग्रेस, महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेस, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, तामिळनाडूतील तमिळ मनिला काँग्रेस, केरळ मधली मणी काँग्रेस हे पक्ष तर काँग्रेस मधून फुटून आपापले राजकीय अस्तित्व आपापल्या राज्यांमध्ये टिकवून आहेत. या राज्यांमधल्या मूळ काँग्रेसच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची आणि मतांची फोडाफोडी करूनच या सगळ्या काँग्रेसने आपापल्या राज्यांमध्ये आपले राजकीय अस्तित्व निर्माण करून मूळ काँग्रेसलाच निष्प्रभ करून टाकले आहे.
मूळ काँग्रेसमध्ये आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार नाहीत. आपल्याला तिथे गांधी परिवारावर किंवा कुठल्याही काँग्रेस हायकमांड वर मात करता येणार नाही, हे लक्षात येताच शरद पवार, ममता बॅनर्जी, जगन मोहन रेड्डी, जी. के. मुपनार, व्ही. एस. मणी आदी नेत्यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या राज्यांमधील मूळ काँग्रेस फोडली. त्यातले नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात ओढून आणले. त्यांच्या बळावर आपला पक्ष वाढविला.
आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचीच “व्होट बँक” फोडून नंतर सत्तेसाठी हेच नेते काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले. यापैकी ममता बॅनर्जी आणि जगन मोहन रेड्डी यांना काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीची गरज लागली नाही. पण शरद पवार, जी. के. मुपनार, व्ही. एस. मणी यांना मात्र मूळ काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीखेरीज गत्यंतर उरले नाही. त्यामुळे हे नेते सत्तेसाठी काँग्रेस बरोबरच्या आघाड्यांमध्ये सामील होऊन मोकळे झाले. पण प्रत्यक्षात काँग्रेसच्याच मूळ वृक्षावरच्या वेली किंवा “राजकीय बांडगुळे” हेच वेगवेगळ्या नावांच्या काँग्रेसचे स्वरूप राहिले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
त्यामुळे काँग्रेस मित्र पक्षांना गिळून टाकते, असे जरी मोदींनी म्हटले असले, तरी प्रत्यक्षात वेगवेगळ्या नावांच्या काँग्रेसनी मूळ काँग्रेसलाच अनेक ठिकाणी गिळून टाकल्याची उदाहरणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिसली.
Actually regional Congress parties swallow original Congress
महत्वाच्या बातम्या
- Nobel Prize : AI गॉडफादर जेफ्री ई. हिंटन आणि अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन जे. होपफिल्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर
- Shagun Parihar : वडील आणि काकांना गोळ्या घालणाऱ्या दहशतवादावर मुस्लिम बहुल किश्तवाड मधून भाजपच्या शगुन परिहारांचा विजय!!
- Muijju : मुइज्जू म्हणाले- भारताच्या सुरक्षेला धक्का पोहोचू देणार नाही, आमचे संबंध चांगले, या भेटीत अधिक दृढ होतील
- Congress : तरुणांचे केले “कोळसे”, ज्येष्ठांना आणले “बाळसे” म्हणून काँग्रेसला सतत पराभवाचे तोंड दिसे!!