पालघरमध्ये सुद्धा सेक्युलर मॉब लिंचिंग हिंदू साधूंचे झालेय…!! कोणा महंमद अखलाखचे नाही. हिंदूंचे लिंचिंग झाले तर देशात असहिष्णुता नसते! अन्य कोणाचे लिंचिंग झाले… तर आणि तरच देशात असहिष्णुता पसरल्याचे सिद्ध होते! हा लिबरल आणि सेक्युलर नियम आहे. हा साधा नियम अर्णवला कळत नाही. तो वाटेल त्याला वाटेल ते प्रश्न विचारत सुटतो आणि उत्तरांएेवजी हल्ला झाला की आरडाओरडा करतो. अर्णवसारख्याला हे शोभत असेल…पण आपल्या ‘सेक्युलर आणि लिबरल’ देशाला हे अजिबात शोभा देत नाही..!
विनय झोडगे
अर्णव गोस्वामीवर हल्ला करणे यात “विशेष” काही घडलेले नाही… कोणत्याही विचारलेल्या टोचणाऱ्या प्रश्नांना उत्तर देता आले नाही की हल्ले करायचे, मारामाऱ्या करायच्या ही तर खरी काँग्रेस संस्कृती आहे. इंदिरा गांधी, संजय गांधी यांनी कष्ट करून आपल्या सत्ताकाळात रूजवलेली ही काँग्रेस संस्कृती आहे… सोनिया गांधी तिचे पालन करत असतील तर त्यांचे यात काय चुकले…?? अर्णव काय किंवा दुसरे कोणी काय काहीही प्रश्न विचारेल. खुसपटे काढेल. त्यांना उत्तरे देण्याची जबाबदारी काय सोनिया गांधींनी घेतली आहे? अजिबात नाही…!! त्यांना काय तेवढाच उद्योग आहे? त्यांना काय एखादे न्यूज नेटवर्क चालवायचे आहे…?? आणि त्यावर काय असहिष्णुतेचे डिबेट चालवायचे आहे…?? त्यांना अख्खा काँग्रेस पक्ष चालवायचा आहे… खरे म्हणजे सारा देश चालवायचा आहे. नव्हे, नव्हे सारा देश चालविण्याची मुख्य जबाबदारी सोनियांनी ज्यांचे अडनाव लावले आहे, त्या गांधी खानदानावर आहे…!! त्यांनी काय अर्णवने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात वेळ घालवायचा…?? का देश चालविण्यासाठी “मोठमोठे उद्योग” करायचे…?? अर्णव सारख्या पत्रकारांना याचे अजिबात “गांभीर्य” नाही…!! वाटेल ते प्रश्न विचारत सुटतात…!! नसते उद्योगी कुठले…!!
आता पालघरच्या सेक्युलर लिंचिंगमध्ये दोन साधूंची हत्या झाली. ते प्रकरण महाराष्ट्र सरकारने सीआयडीकडे सोपविले आहे ना…!! झाले तर मग. यात सोनियांचा संबंध आला कोठे? त्यांनी कशाला यात लक्ष घालायला पाहिजे? सेक्युलर लिंचिंग हिंदू साधूंचे झालेय ना…!! अन्य कोणी मारला गेलाय का त्यात? मग सोनिया गांधींनी का आवाज उठवायचा त्यासाठी…?? अर्णव वाटेल ती अपेक्षा करतो…!!
सोनिया गांधींचे सोडा… एका तरी लिबरलने तोंडातून अथवा ट्विटरवर एक शब्द तरी काढलाय का? अमिर खान, स्वरा भास्कर, नसरुद्दीन शहा, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनुराग कश्यप यांनी आपापले सोशल मीडिया अकाउंट “क्वारंटाइन” करून ठेवलेत की नाहीत…?? किंबहुना या सगळ्या लिबरल्सनी स्वत:ला सध्या वैचारिकदृष्ट्याही क्वारंटाइन करून घेतलेय की नाही…?? एवढा तबलिगी जमातीने कोरोनाचा गोंधळ घालून ठेवलाय या देशात. पण एका तरी लिबरलने एक तरी शब्द लिहिलाय का त्याबद्दल? मग बरोबरच आहे त्यांचे. कोरोनाला मूळातच धर्माशी जोडूच नये मुळी…!!
आणि पालघरमध्ये सुद्धा सेक्युलर मॉब लिंचिंग हिंदू साधूंचे झालेय…!! कोणा महंमद अखलाखचे नाही. हिंदूंचे लिंचिंग झाले तर देशात असहिष्णुता नसते…!! अन्य कोणाचे लिंचिंग झाले… तर आणि तरच देशात असहिष्णुता पसरल्याचे सिद्ध होते…!! हा लिबरल आणि सेक्युलर नियम आहे. हा साधा नियम अर्णवला कळत नाही. तो वाटेल त्याला वाटेल ते प्रश्न विचारत सुटतो आणि उत्तरांएेवजी हल्ला झाला की आरडाओरडा करतो. अर्णवसारख्याला हे शोभत असेल… पण आपल्यासारख्या “सेक्युलर आणि लिबरल” देशाला हे अजिबात शोभा देत नाही…!!
The fourth pillar of democracy is integral to nation building. Without a free & functioning press, our democracy is under threat & without an informed electorate our nation will never reach its full potential. #NationalPressDay pic.twitter.com/LiL2fx67kc
— Congress (@INCIndia) November 16, 2019