• Download App
    संघराज्याला आव्हान आरोग्याच्या मूळावर बंगाल आणि महाराष्ट्र "आघाडीवर" | The Focus India

    संघराज्याला आव्हान आरोग्याच्या मूळावर बंगाल आणि महाराष्ट्र “आघाडीवर”

    राजकीय मतभेदांचे टोक गाठत देशाच्या संघराज्य व्यवस्थेला दिलेले आव्हान आता बंगाल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याच्या मूळावर येऊन ठेपले आहे.


    विनय झोडगे

    केंद्रात मोदींचे सरकार आहे ना, मग नाही एेकत आम्ही त्यांचे जा…!! हे म्हणणे आहे बंगाल आणि महाराष्ट्र सरकारांचे. जोपर्यंत ते राजकीय कारणांसाठी तोपर्यंत ठीक होते. पण ते कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारी लपवाछपवी पर्यंत आले आणि लोकांच्या आरोग्याचे गणित बिघडायला लागले. बंगालमधून याच्या बातम्या आठवड्यापासून येतच होत्या पण आता मालेगाव? मालेगावमध्येही तेच? काल सायंकाळपर्यंत मालेगावचा आकडा ८ ने वाढला होता. तो रात्रीत ५६ ने वाढला.

    केंद्राला होणाऱ्या रिपोर्टिंगमध्ये आकडा वाढतोय ८ ने आणि मध्यरात्री एकदम आकडा वाढतोय ५६ ने…!! हा वैद्यकीय चमत्कार म्हणावा काय?

    कालच्या केंद्रीय आरोग्य सचिवांच्या डेली बिफ्रिंगमध्ये याचा वेगळाच खुलासा झाला. त्यांनी म्हणे देशाची दैनंदिन आकडेवारी चुकू नये यासाठी बंगाल सरकारला वेळेत आणि योग्य आकडेवारी देण्यासाठी convince केले. योग्य आणि वेळेत आकडेवारी देण्यासाठी convince करावे लागते? मालेगाव एपिसोडनंतर ते महाराष्ट्र सरकारला convince करणार काय? एवढी वेळ येऊन ठेपली?

    मुंबई, मुंब्रा येथील आकडेवारी लपवाछपवीच्या बातम्या पूर्वीही आल्या पण महाराष्ट्र सरकारची कालची दुपारची आकडेवारी? त्यात ६०० चा फरक? आणि मालेगावची सायंकाळची आकडेवारी? आणि रात्रीत एकदम ५६ कोरोनाग्रस्तांची वाढ…!! हा काय प्रकार आहे? बंगाल आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधली ही प्रशासकीय अनास्था आहे? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुका आहेत? की राजकारण? यात नक्की राजकारण आहे… पण हे संघराज्यालाच दिलेले आव्हान आहे. यात लोकांच्या आरोग्याशी खेळ होतोय. दोन राज्यांचे आकडे चुकले की वैद्यकीय सुविधा पुरविण्यात, आर्थिक तरतुदीत घोळ होतात.

    केंद्रीय पातळीपर्यंत त्याचे पडसाद पोहोचतात. हे बंगाल आणि महाराष्ट्राच्या धुरिणांना समजत नाही का? तरीही राजकारण खेळून लोकांच्या आरोग्याशी खेळले जातेय.

    मोदींच्या विरोधातील सरकारे बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यांमध्ये आहेत काय? आंध्र, तेलंगण, तमिळनाडू, ओरिसा, केरळ, पंजाब आदी राज्यांमध्ये विरोधी सरकारे नाहीत का? तेथे काय राजकारण चालत नाही? भाजप शासित राज्यांमध्ये नाही चालत का राजकारण? पण कोविड १९ चे गांभीर्य या सर्व राज्य सरकारांनी पाळून राजकीय प्रगल्भता दाखविली आहे. मग बंगाल आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वांना काय झाले आहे?

    एरवी उत्तर प्रदेश, बिहारची प्रशासने अशी संकटे हातळण्यात अपयशी ठरल्याच्या चर्चा पूर्वी होत असत. आरोग्य व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थांचा बोजवारा उडल्याच्या बातम्या येत असत. त्या तुलनेत आज ही दोन्ही राजपर्यंत कोविड १९ चा मुकाबला परिमाणकारकतेने करताना दिसतात. या राज्यांच्या तुलनेत बंगाल आणि महाराष्ट्र ही राज्ये कुठे आहेत? राजकारणा पलिकडे जाऊन खरंच आत्मपरीक्षणाची गरज आहे…!!

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!