Friday, 2 May 2025
  • Download App
    शाहीनबागचे बौद्धिक पिता तबलिगींमागे उभे राहायला सुरवात झाली...!! | The Focus India

    शाहीनबागचे बौद्धिक पिता तबलिगींमागे उभे राहायला सुरवात झाली…!!

    शाहीनबागी आंदोलनाचे बौद्धिक पितृत्व घेणारे काँग्रेसी आणि डावे म्होरके तबलिगींविरोधातील कारवाईने खवळले आहेत. त्यांनी आता तबलिगींना बौद्धिक इंधन पुरवायला सुरवात करून देश पेटवायचीही तयारी सुरू केली आहे…!! 


    विनय झोडगे

     कोरोना देशभर फैलावणाऱ्या तबलिगीं विरुद्ध इकडे कठोर कारवाई काय सुरू झाली, तिकडे शाहीनबागी आंदोलनाचे बौध्दिक पितृत्व स्वीकारणाऱ्यांच्या पोटातले पित्त उफाळून आले. त्यांना तबलिगी बौद्धिक वांत्या सुरू झाल्या. अमेरिकन नागरिक पत्रकार सिद्धार्थ वरदराजन, डावी विद्यार्थी संघटना एएसएफआय आणि दस्तुरखुद्द सोनिया गांधी अशी या बौद्धिक वांतीवीरांची नावे आहेत. इकडे निजामुद्दीनच्या तबलिगी मरकजवर कारवाई होते. तबलिगींचे घातक मनसूबे देशासमोर उघड व्हायला लागतात. परकीय नागरिकांवर कारवाईचा फास आवळला जातो आणि तिकडे त्याच दिवशी सोनिया गांधींना लॉकडाऊन मधील सरकारी अपूर्ण तयारीचा “साक्षात़्कार” होतो. त्या सरकारवर CWC मध्ये सरकारवर टीकेची झोड उठवून मोकळ्या होतात. नंतर नेहमी प्रमाणे डॉ. मनमोहनसिंग यांना कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात काँग्रेस पक्ष सरकारच्या पाठिशी असल्याचा खुलासा करावा लागतो. यातूनच तबलिंगीवर कारवाई झाल्याचा काँग्रेसींना किती त्रास झाला अाहे, ते कळते. शाहीनबागी आंदोलनाला हेच काँग्रेसी “मागून” पाठिंबा देत होते.            उत्तर प्रदेशात योगींनी शाहीनबागी आंदोलकांचे कंबरडे मोडले होते. त्यांच्याकडून दंगल केल्याबद्दल दंड वसूल करण्याचा सपाटा लावला होता. त्याचा राग सिद्धार्थ वरदराजनच्या डोक्यात होताच. तो कोरोना संकटाच्या वेळी योगींनी केलेल्या उपाययोजनांच्या वेळी उफाळून आला.

    योगींच्या उपाययोजनांमध्ये त्यांना सगळा “हिंदू अजेंडा” दिसू लागला. त्यांनी बौद्धिक गरळ ओकले. आता ते कोर्ट केसच्या सपाट्यात सापडले आहेत.                          इकडे अाज मोदींनी ५ एप्रिलच्या प्रकाश संकल्पाचे काय आवाहन केले, तिकडे डावी विद्यार्थी संघटना एएसएफआय च्या डोक्यात अंधार दाटून अाला. त्या “अंधारी प्रकाशात” एएसएफआय च्या म्होरक्यांना मोदींमधला बिग बॉस दिसायला लागला. “बिग बॉस चाहते है, आप मोमबत्ती जलाए” अश् मीम्स त्या संघटनेच्या सोशल मीडिया हँडलवर फिरायला लागल्या.                                     वर उल्लेख केलेल्या तीनही प्रवृत्तींमध्ये समान सूत्र आहे, मोदींना विरोधासाठी देश विरोधाचेही टोक गाठायचे. मोदीं विरोधात देश विघातक शक्तींना बौद्धिक इंधन पुरवठा करायचा. त्या इंधनातून मोदी विरोधाच्या नावाने देश पेटवायचा. शाहीनबागी आंदोलनात हेच घडले….. तबलिगीं विरोधातील कारवाई नंतर बौद्धिक इंधनाची जमवाजमव करून तेच करायचेय…!!  मोदी विरोधातील आपला कंडू शमला पाहिजे….. मग देश पेटला तरी चालेल…!!

    आव्हाड, थोरात दिवे लावणार नाहीत…!!
    सोनियांनी मोदींविरोधात आघाडी उघडली आणि महाराष्ट्रातले त्यांचे सरदार, दरकदार पुढे सरसावले. मोदींनी सामान्य माणसांना दिवे लावायला सांगितले आणि महाराष्ट्राचे काँग्रेसी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नबाब मलिक सटकल्यासारखे बोलायला लागले. अर्थात आव्हाड बोलायला लागले म्हणजे समजायचे मोदींचा बाण अचूक लागलाय…!! आव्हाड ज्याला विरोध करतात, ती गोष्ट सामाजिक हिताची असते. लोकप्रिय असते असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. अर्थात आव्हाडांचा मोदीद्वेष हा मोदींच्या लोकप्रियतेचा बँरोमीटर आहे. आव्हाडांनी मोदींविरोधात बोलायला सुरवात केली की समजायचे मोदींची लोकप्रियता वाढती आहे…!! इकडे शरद पवार २२ मार्चला टाळ्या वाजवतात. तिकडे आव्हाड आणि नबाब मलिक दिवे लावायला विरोध करतात…!! याला म्हणतात, “राष्ट्रवादी”

    Related posts

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??

    Caste census : काँग्रेसने राहुलच्या यशाचे ढोल पिटले तरी प्रत्यक्षात मोदींचे “कमंडल” राजकारण यशस्वी, “मंडल” राजकारणात एन्ट्री!!

    मोदी तिकडे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायच्या बेतात; पवार इकडे दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलात!!