• Download App
    शरद पवारांचे 'फसवेबुक लाइव्ह' | The Focus India

    शरद पवारांचे ‘फसवेबुक लाइव्ह’

    कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र निर्माण होतेय, हे पवारांना मान्य आहे. फक्त तसे करणे चुकीचे आहे, एवढेच पवारांना म्हणायचे आहे! यालाच तर मराठीत म्हणतात, “करून सावरून नामा निराळे राहणे..!


    विनय झोडगे

    पालघरच्या मॉब लिंचिंगवरून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चुकीचे चित्र निर्माण होतेय, अशी मखलाशी शरद पवारांनी फेसबुक लाइव्हमध्ये केली पण ती अर्धीमुर्धीच ठरली.  म्हणजे कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र निर्माण होतेय, हे पवारांना मान्य आहे. फक्त तसे करणे चुकीचे आहे, एवढेच पवारांना म्हणायचे आहे…!! यालाच तर मराठीत म्हणतात, “करून सावरून नामा निराळे राहणे…!!” म्हणजे करायचे सगळे आपण. पण जे करायचे ते करून होताच बाजूला व्हायचे.

    आता हे पाहा, पालघर जिल्ह्यातील साधूंच्या सेक्युलर लिंचिंगला जबाबदार कोण तर… राष्ट्रवादीचा झेडपी सदस्य काशीनाथ चौधरी. त्याच्या बरोबरीला कोण तर… कम्युनिस्ट पक्षाचे तीन पंचायत सदस्य. हे सर्वजण साधूंना मरेपर्यंत मारहाण करणाऱ्यांच्या जमावात होते. किंबहुना त्यांच्याच सांगण्यावरून जमाव मॉब लिंचिंगवर उतरला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

    खरेतर हा सखोल चौकशीचा विषय आहे. मुख्यमंत्र्यांनी सीआयडीकडे चौकशी सोपवली देखील आहे… पण पवारांचे फेसबुक लाइव्हमध्ये statement काय, तर “पालघरची घटना गैरसमजातून घडली. ती घडायला नको होती. पक्षीय पातळीवर काय निर्णय घ्यायचाय तो घेऊ. पण आता ती वेळ नव्हे; आता एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करण्याची वेळ आहे…!!”

    असे कसे? मॉब लिंचिंगची घटना गैरसमजातून घडल्याचे चार दिवसांपासून सोशल मीडियावर फिरतेय. तो काही सीआयडी चौकशीचा निष्कर्ष नाही. मग पवार कशी त्या “गैसमजाला” पुष्टी देऊ शकतात? की सीआयडी चौकशीचा निष्कर्ष त्यांना आधीच कळला आहे…?? पवारांनी वरील खोटे विधान रेटून केले आहे. वास्तविक पाहता राज्याचा गृहमंत्री राष्ट्रवादीचा. पालघरच्या मॉब लिंचिंगचा “कर्ता” राष्ट्रवादीचा. आणि “गैरसमजाला” पुष्टी देणारे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष…!! असा हा मामला आहे. या अर्थाने शरद पवारांचे ते “फेसबुक लाइव्ह” नसून “फसवेबुक लाइव्ह” ठरले आहे.

    या सर्व प्रकारात मुंबईतील कोरोनाच्या भयावह परिस्थितीविषयी गांभीर्याने बोलायला पवार तयार नाहीत की मुख्यमंत्री. फेसबुक लाइव्ह करताना एकाची तंतरती तर दुसरे खोटे बोल पण रेटून बोल असे करतात. यात फेसबुक लाइव्ह करण्याची नुसती fashion करून पूर्ण होते. पण कोरोनाशी लढाईचे गांभीर्य हरवून जाते आणि त्याचे फटके जनता खाते…!!

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!