महाराष्ट्राचे उथळ उर्जामंत्री नितिन राऊत यांना खूद्द महावितरणने चपराक लगावली. कारण मूळात जे घडणार नाही, त्याबद्दल रडत राऊत बसले. मोदींवर दुगाण्या झाडून आपली उर्जा खात्याबद्दलची नसलेली ‘अगाध माहिती’ उघड करुन बसले…
विनय झोडगे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरातील वीज दिवे बंदच्या आवाहनामुळे निर्माण होणाऱ्या वीज मागणी कपातीला तोंड देण्यास नँशनल पॉवर ग्रीड पूर्णपणे सज्ज आहे, असा खुलासा केंद्रीय उर्जा सचिवांनी आणि महाराष्ट्राच्या वीज पुरवठा कंपनीने केला. रात्री ९.०० वाजता ९.०० मिनिटांच्या वीज दिवे बंदमुळे मूळात फारशी वीज मागणीत कपातही होणार नाही.
घरातील फक्त वीज दिवे बंद होणार आहेत. घरातील टीव्ही, फ्रीज, अन्य उपकरणे, रस्त्यावरचे दिवे, रुग्णालयांमधील वीज दिवे, अन्य वीज यंत्रणा बंद राहणार नाहीत. त्यामुळे नँशनल ग्रीडमधून होणाऱ्या वीजपुरवठा ९.०० मिनिटांनंतर पूर्ववत करण्यातही अडचण येणार नाही, असा खुलासा केंद्रीय उर्जा सचिव संजीव नंदन सहाय यांनी केला आहे. त्याला महाराष्ट्राच्या वीज पुरवठा मंडळाने दूजोराही दिला. यातून महाराष्ट्राचे उथळ उर्जामंत्री नितिन राऊत यांना चपराक बसली. कारण मूळात जे घडणार नाही, त्याबद्दल रडत राऊत बसले. मोदींवर दुगाण्या झाडून आपली उर्जा खात्याबद्दलची नसलेली “अगाध माहिती” उघड करुन बसले. वास्तविक मोदींनी ९.०० मिनिटांसाठी घरगुती वीज दिवे बंद करण्याचे आणि अन्य दिवे उजळण्याचे मर्यादित आवाहन केले आहे, पण राहुल गांधींचे उथळ अनुयायी असलेल्या नितीन राऊतांना हॉस्पिटलमधील दिवे, व्हेंटीलेटर बंद पडणार असल्याचा “साक्षात्कार” झाला.
काल सकाळी काही चँनेली पत्रकारांना ते ९.०० मिनिटांच्या घरगुती वीज दिवे बंदचे “तोटे” “वाचून” दाखवत होते. मोदींवर टीका करताना आपण नेमके काय बोलतोय याचे त्यांना भानच उरले नाही. माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सकाळीच वीज मागणीची कपात, त्याचे व्यवस्थापन यांची तांत्रिक माहिती देऊन नितीन राऊतांच्या पॉवर ग्रीडच्या नुकसानीच्या आणि वीज पुरवठा सुरळित करायला ८-१० तास लागण्याच्या दाव्यातील हवा काढली. केंद्रीय उर्जा सचिवांनी आणि महाराष्ट्राच्या वीज पुरवठा मंडळाने सर्व तयारीची माहिती देऊन राऊत यांची उरली सुरली “उतरवली…!!”