ट्रिपल तलाकला विरोध ते पालघर सेक्युलर लिंचिंग व्हाया शाहीनबाग या सर्वांमागे एक समान सूत्र आहे, ते म्हणजे अल्पसंख्याकवादाचे. हा देश हिंदुत्वाच्या आधारावर नव्हे, तर राज्य घटनेचे आवरण घेऊन अल्पसंख्याकवादावर चालला पाहिजे, ही विचारसरणी थोपविण्याचा डाव आहे.
विनय झोडगे
पालघरच्या सेक्युलर लिंचिंगचे धागेदोरे जसजसे उलगडले जात आहेत आणि त्याचे राजकीय, सामाजिक कोन समोर येत आहेत, तसतसे या घटनेमागचे sinister design उलगडत चालले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील मोदींच्या विजयापेक्षा काँग्रेसच्या पराभवानंतर या design ची नेपथ्यरचना करायला सुरवात झाली, असे मानण्यास पुरेसा वाव आहे. या सर्व प्रकारात सामोरा येतोय तो म्हणजे काँग्रेस आणि लिबरल्स यांनी वर्षानुवर्षे पोसलेला अल्पसंख्याकवाद…!!
मोदी जसजशी सर्वसमावेशक भूमिका घेताहेत आणि ती भूमिका हिंदुत्वाच्या prism मधून सगळे जग स्वीकारू लागले आहे तसतशी काँग्रेस आणि लिबरल्सची ब्रिगेड अस्वस्थ झाली आहे. त्यातून हे सेक्युलर लिंचिंगचे प्रकार घडवायचा डाव खेळला जातोय. हिंदू साधूंचे लिचिंग करून भाजपला पुन्हा हिंदुत्वाकडे ढकलण्याचा डाव खेळता आला तर पाहायचाय.
भाजपला १९९० च्या दशकातल्या हिंदुत्व राजकारणाकडे push केले की काँग्रेस आणि लिबरल्स आपले मूळचे अल्पसंख्याकवादी राजकारण करायला मोकळे होतील, असे त्यांच्या think tank ला वाटते आहे.
२०१९ च्या निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि लिबरल्सच्या strategy मध्ये विशिष्ट सलगता दिसून येतेय. ट्रिपल तलाक, काश्मीर ३७०, CAA – NCR ला विरोध, शाहीनबाग, तबलिगी मरकजमधील धार्मिक मेळावा आणि आताचे पालघर सेक्युलर लिंचिग यामध्ये अल्पसंख्याकवादाची totalitarian विचार प्रणाली सलगतेने कार्यरत झालेली दिसते.
या प्रत्येक विषयाच्या shades वेगवेगळ्या आहेत. त्या विरोधात दिसलेल्या आंदोलनांची तीव्रताही कमी जास्त आहे. पण या सर्वांना गुंफणारा धागा मात्र समान आहे, तो म्हणजे अल्पसंख्याकवाद…!! बहुसांस्कृतिकता, बहुजिनसी समाज, गंगा – जमनी तहजीब या संकल्पनांच्या गोंडस नावाखाली काँग्रेस आणि लिबरल्सनी गेली ७० – ८० वर्षे याच अल्पसंख्याकवादाचे भरणपोषण केले आहे.
डॉ. मनमोहनसिंग यातूनच म्हणाले होते ना… भारतातील नैसर्गिक स्रोतांवर अल्पसंख्याकांचा पहिला अधिकार आहे… त्यांच्या या विधानामागे देखील हाच अल्पसंख्याकवाद होता. डॉ. मनमोहनसिंग यांचे देशाच्या economic reforms मधले अतुलनीय योगदान नाकारायचा येथे प्रश्न नाही. पण त्या वेळी नरसिंह रावांसारखे कणखर पंतप्रधान त्यांच्या पाठिशी उभे होते.
२००४ नंतर परिस्थिती बदलली. डॉ. मनमोहनसिंग यांना सोनिया गांधींच्या आधिपत्याखाली काम करावे लागले हे विसरून चालणार नाही. त्यामुळे त्यांच्या अल्पसंख्याकवादी विधानामागची प्रेरणा वेगळी होती, ही राजकीय वस्तुस्थिती समजावून घेतली पाहिजे.
२०१४ चा मोदींचा विजय हा अपवाद ठरला नाही. २०१९ मध्येही तेच पुन्हा विजयी झाले. आणि आता तर कोरोनाच्या निमित्ताने का होईना सर्व देश मोदींच्या मागे एकवटत आहे. मोदी हे जणू विरोधकांची पर्यायाने काँग्रेस आणि लिबरल्सची वैचारिक आणि राजकीय space च काढून घेत आहेत. म्हणून आणि म्हणूनच काँग्रेस आणि लिबरल्स एक प्रकारे reverse gear टाकून भाजपला १९९० च्या हिंदुत्व अजेंड्याकडे ढकलायला पाहात आहेत. त्यातूनच ट्रिपल तलाकला विरोध ते पालघरचे सेक्युलर लिंचिंग व्हाया शाहीनबाग असा अल्पसंख्याकवादाचा जुनाच डाव नव्याने खेळला जातोय…!!