कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे संपूर्ण देश संकटात सापडला असताना उत्तर प्रदेशातील गोरगरीबांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मसीहा बनून पुढे आले आहे. देशाातील कोरोनाच्या संकटानंतर योगी आदित्यनाथ यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याचे उदाहरण सर्व राज्यांसमोर घालून दिले आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर काम करणार्या तब्बल २७ लाख ५० हजार मजुरांच्या खात्यात उत्तर प्रदेश सरकारने थेट ६११ कोटी रुपये भरले आहे.
अभिजित विश्वनाथ
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे संपूर्ण देश संकटात सापडला असताना उत्तर प्रदेशातील गोरगरीबांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मसीहा बनून पुढे आले आहे. देशाातील कोरोनाच्या संकटानंतर योगी आदित्यनाथ यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याचे उदाहरण सर्व राज्यांसमोर घालून दिले आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर काम करणार्या तब्बल २७ लाख ५० हजार मजुरांच्या खात्यात उत्तर प्रदेश सरकारने थेट ६११ कोटी रुपये भरले आहे.
देशात कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी सर्व शासकीय यंत्रणा गेल्या १५ दिवसांपासून कार्यान्वित केली होती. पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यावर त्यांनी तातडीने उत्तर प्रदेशातील जनतेला दारात जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी व्यवस्था केली. त्यासाठी १० हजार वाहनांची व्यवस्था केली.
मात्र, लॉकडाऊनचा सर्वाधिक गोरगरीब मजुरांना बसणार असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी काम सुरू केले. गेल्या आठ दिवसांपासून यासाठी योजना आखण्यासाठी शासकीय अधिकार्यांच्या बैठका ते घेत होते.सर्व माहिती गोळा करत होते. रोजगार हमी योजनेवर काम करणार्या सर्व मजुरांच्या खात्यात सोमवारी रक्कम टाकण्यात आली. यासाठी ६११ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर अगदी तळापर्यंत पारदर्शकपणे ही मदत पोहोचावी यासाठी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे प्रत्येक जिल्ह्यातील एका मजुराशी संवाद साधला. त्याच्याकडून अडचणी जाणून घेतल्या.
उत्तर प्रदेशातील मजूर देशातील सर्व राज्यांत आहेत. त्यांच्यासाठीही योगी आदित्यनाथ सतत काम करत आहेत. राज्यातील वरिष्ठ शासकीय अधिकार्यांना प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. स्वत: योगींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भावूक पत्र लिहिले. आपल्या राज्यातील मजुरांची निवारा आणि भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती केली. यासाठीचा निधी गरज पडल्यास उत्तर प्रदेश सरकारकडून दिला जाईल असेही सांगितले. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात असलेल्या प्रत्येक राज्यातील नागरिकाची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यासाठी त्यांनी अधिकार्यांचे खास पथक तयार केले आहे.
अरविंद केजरीवाल यांना पत्रात योगी आदित्यनाथ म्हणाले की उत्तर प्रदेशात असलेल्या दिल्लीतील लोकांची काळजी आम्ही घेत आहोत. तुम्ही दिल्लीत असलेल्या आमच्या राज्यातील जनतेची काळजी घ्या. यासाठी उत्तर प्रदेश सरकारने दोन अधिकार्यांना दिल्लीमध्ये तन्ौात केले आहे. त्यांचे मोबाईल क्रमांकही अरविंद केजरीवाल यांना पत्राद्वारे देण्यात आले.
योगी आदित्यनाथ यांनी नुकताच उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. आतपर्यंत त्यांच्या वक्तव्यांमुळेच ते वादाच्या भोवºयात सापडत आले होते. पण कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर त्यांनी परिस्थिती ज्या पध्दतीने हाताळली आहे त्यामुळे विरोधकही आता त्यांचे कौतुक करत आहेत. रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या खात्यात थेट पैसे टाकण्याच्या त्यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
त्याचबरोबर ते सातत्याने विविध ठिकाणच्या जिल्हाधिकार्यांशी संवाद साधत आहेत, बैठका घेत आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊन असतानाही नोएडातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी या भागाचा दौरा केला.
गौतम बुध्द नगर येथे घेतलेल्या बैठकीत त्यांनी नोएडाच्या जिल्हाधिकार्यांना चांगलेच फैैलावर घेतले. येथील नोएडा की सीज फायर कंपनीमध्ये आलेल्या लंडनमधील युवकामुळे जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा फैैलाव झाला. या कंपनीच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्यात आली नाही. यामध्ये जिल्हाधिकार्यांना पुरेशा गांभिर्याने काम केले नाही असे म्हणत त्यांना योगींनी झापडले. संबंधित जिल्हाधिकार्यांना दीर्घकालीन रजेवर पाठविण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले.
उत्तर प्रदेशातील कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण नोएडामध्ये आहेत. त्याचबरोबर याच बैठकीत स्थलांतर करून आलेल्या मजुरांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्थित काळजी घेतली नसल्याबद्दलही योगींनी अधिकार्यांना फैैलावर घेतले.
(लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)