इंग्रजी, डच, स्पॅनिश, रशियन, ग्रीक आणि हिंदी या भाषांचे उच्चार वेगळे असले तरी त्यांच्यामध्ये अनेक शब्द समान आढळतात. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास इंग्रजीमध्ये मदर, जर्मन भाषेत मटर, रशियनमध्ये मॅट, पर्शियनमध्ये मादर, हिंदीमध्ये मा आणि लॅटिनमध्ये मातेरी या सर्व शब्दांचा अर्थ माता असा होतो. या शब्दांचा उगम मेहतर या प्रोटो- इंडो -युरोपीयन शब्दापासून झालेला आहे. आहे की नाही गमतीचा भाग. मानवी संस्कृतीचा इतिहास म्हणजे खरे तर स्थलांतराचा इतिहास. भाषेचा इतिहास. You know … Hindi, English originated in Turkey
आदिम काळापासून जीवनाच्या शोधात भटकणारा माणूस आपल्याबरोबर आपली संस्कृती आणि भाषाही जागोजागी घेऊन गेला. न्यूझीलंडमधील ऑकलंड क्वेन्टिन अटकिन्सन विद्यापीठात जगातील भाषांवर संशोधन करण्यात येत आहे. तेथील संशोधकांच्या मते आज जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील हिंदी, रशियन, जर्मन आणि इंग्रजी या भाषांचे उगमस्थान सध्या तुर्कस्तानात असलेल्या अनातोलिया या ठिकाणी होते . सुमारे आठ हजार ते नऊ हजार वर्षापूर्वी या इंडो-युरोपीयन कुळातील भाषांचा आशियाच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
जीवशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली या संशोधकांनी संगणकाच्या मदतीने १०३ नव्या आणि जुन्या भाषांमधील शब्दांचा अभ्यास केला. इंडो-युरोपीयन भाषांच्या उगमाबद्दल दोन महत्त्वाची गृहीतके आहेत. त्यानुसार युरोप-रशियामधील पॅन्टिक गवताळ प्रदेशात सहा हजार वर्षापूर्वी इंडो-युरोपीयन भाषेचा उगम झाला. तर काहींच्या मते अनातोलियामधून साडे नउ हजार वर्षापूर्वी या भाषांचा प्रसार सुरू झाला. त्यावर संशोधनासाठी संशोधकांनी १०३ भाषांतील आजारांसाठी वापरले जाणारे शब्द आणि प्राथमिक शब्दसंपदा यांचा अभ्यास केला. त्यावरून कुटुंबांच्या विस्ताराचा आराखडा तयार करून गृहीतक पडताळून पाहिले. इंडो-युरोपीयन भाषा समुदायाचे मूळ गवताळ प्रदेशापेक्षा अनातोलियामध्येच असावे या मताला पुष्टी देणारे पुरावे यात आढळले. अनातोलियाचे शेतकरी बोलत होते. त्यांनी युद्धे न करता आपल्या कार्यसंस्कृतीद्वारा आपल्या भाषेचा प्रसार केला.