• Download App
    कृष्ण विवर किंवा ब्लॅक होल म्हणजे नक्की काय?। What is Black whole

    कृष्ण विवर किंवा ब्लॅक होल म्हणजे नक्की काय?

    ब्लॅक होलबाबत सर्वसामान्यांना मोठे कुतूहल असते. त्याबाबत अनेक अख्यायिकामुळे त्यात भर पडलेले आहे. पहिली गोष्ट म्हणजे ब्लॅक होल या नावाचा शब्दशः अर्थ घेऊ नये, हे काही जमिनीला पडलेलं छिद्र किंवा खोदून तयार केलेला खड्डा नाही. ब्लॅक होल अर्थात कृष्णविवर हा एक खूप जास्त घनतेचा आणि गुरुत्व बल असलेला खगोलीय घटक आहे. ज्याची निर्मिती काही ताऱ्यांच्या अंतिम स्थितीत होते. कृष्णविवराच्या निर्मितीसाठी ताऱ्यांचे वस्तुमान खूप जास्त असावे लागते. आपल्या सौरमंडळातील सूर्याचे वस्तुमान कमी असल्याने त्याचे कृष्णविवरात रूपांतर होण्याची शक्यता अगदी नगण्य आहे. What is Black whole

    आपल्या सूर्याच्या वस्तुमानापेक्षा कैक पटींनी जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रुपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की प्रकाशदेखील त्यांना भेदून बाहेर पडू शकत नाही आणि यामुळेच अशा तार्यां ना कृष्णविवर म्हणतात. अंदाज घ्यायचा झाल्यास, एका नाण्याच्या व्यासा इतके क्षेत्रफळ असलेले कृष्णविवर विचारात घ्या. एका नाण्या एवढ्या कृष्णविवराच्या घनतेचा विचार केल्यास त्याचे आणि पृथ्वीचे वस्तुमान समान असेल. आणि या छोट्याशा कृष्णविवराचे गुरुत्वाकर्षण आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा एक अब्ज अब्ज पट अधिक असेल. नुक्लिअर चेन रिॲक्शननुसार तार्याकच्या गाभ्यात हायड्रोजनचे रूपांतर हेलियम मध्ये होत असते. आणि हेलियम वजनाने हलका असल्याने वस्तुमानातील फरकाचे प्रचंड उर्जेत रूपांतर होते. ही उर्जा सर्व बाजूला विखुरली जाऊन तार्यालला प्रसरण अवस्थेत ठेवते व तारा तेजस्वी दिसतो.

    अखेर एक वेळ अशी येते जेव्हा तार्यातच्या गर्भातील सर्व हायड्रोजन ज्वलन होऊन संपते आणि रूपांतरित हेलियमचे ज्वलन होण्यास सुरवात होते. अखेरीस जेव्हा हेलियम सुद्धा संपते तेव्हा तार्याोचा पृष्ठभाग केंद्राच्या दिशेला कोसळतो. तारा जितका आकाराने मोठा तितका हायड्रोजन ज्वलनाचा वेग जास्त, त्याामुळे प्रचंड मोठे तारे संख्येने कमी असतात. आपल्या सूर्याचे इंधन संपायला अजून एक हजार कोटी वर्षे लागतील. तर सूर्याच्या केवळ तीन पट मोठा असणारा तारा फक्त ५० कोटी वर्षेच टिकेल.

    What is Black whole

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!