• Download App
    विज्ञानाची गुपिते : सर्व सजीवांमध्ये आढळणारे आरएनए म्हणजे काय ? । The Secret of Science: What is RNA found in all living things?

    विज्ञानाची गुपिते : सर्व सजीवांमध्ये आढळणारे आरएनए म्हणजे काय ?

    सर्व सजीवांमध्ये आढळणारे आणि त्यांना आवश्यक असणारे मोठ्या रेणूभाराचे जैव रेणू. रासायनिक दृष्ट्या न्यूक्लिइक आम्ले दोन प्रकारची असतात; डीऑॅक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल (डीएनए) आणि रिबोन्यूक्लिइक आम्ल (आरएनए). आरएनए रेणूची संरचना डीएनए रेणूप्रमाणेच असते. मात्र, आरएनएच्या रेणूत पॉलिन्यूक्लिओटाइडाची एकच साखळी असते. तसेच आरएनएमधील न्यूक्लिओटाइड डीएनएमधील न्यूक्लिओटाइडाहून थोडे वेगळे असतात. त्यांच्यातील नायट्रोजनयुक्त आम्लारी अॅडेनीन, ग्वानीन, सायटोसीन आणि थायमीनाऐवजी युरॅसिल हे असतात. The Secret of Science: What is RNA found in all living things?

    आरएनएचे रेणू पेशींमध्ये संकेतन, संकेत वाचन, नियमन आणि जनुकांची अभिव्यक्ती अशी महत्त्वाची कार्ये करतात. आरएनए रेणूचे तीन प्रकार असतात आणि त्यांचे कार्य वेगवेगळे असते. त्यांना संदेशवाही-आरएनए, रिबोसोमी-आरएनए आणि स्थानांतरी-आरएनए अशी नावे आहेत. काही विषाणूंमध्ये जनुकीय पदार्थ डीएनए नसून आरएनए असतात. सजीवांची निर्मिती, पेशींची निर्मिती आणि वाढ पेशीविभाजन आणि प्रजनन इत्यादी क्रियांवर न्यूक्लिइक आम्लांचे नियंत्रण असते. डीएनएच्या लहान, विशिष्ट खंडांना जनुक म्हणतात. ही जनुके आनुवांशिक गुणधर्म एका पिढीतून पुढच्या पिढीत संक्रमित करतात. प्रथिनांची निर्मिती करणे आणि त्यांवर नियंत्रण ठेवणे ही डीएनएची कार्ये आहेत. पेशीचक्राच्या एका टप्प्यावर डीएनए रेणू द्विगुणित होतो. या क्रियेत मूळ डीएनएचा रेणू साच्यांसारखे काम करतो आणि त्यापासून डीएनएचे दोन रेणू तयार होतात. ही प्रक्रिया अनेक वेळा घडून येते. अशा प्रकारे पेशीविभाजनातून नवीन जन्य पेशी तयार होतात. या जन्य पेशीत मूळच्या डीएनएप्रमाणे नवीन तयार झलेला डीएनएचा हुबेहुब रेणू असतो.

    या प्रक्रियेमुळे दोन पिढ्यांतील गुणधर्म सातत्य टिकून राहते. प्रथिनांच्या निर्मितीत न्यूक्लिइक आम्ले महत्त्वाची भूमिका पार पाडतात. डीएनएच्या साच्यापासून संदेशवाही-आरएनए तयार होते. हा संदेशवाही-आरएनए पेशीद्रवातील रिबोसोम या पेशीअंगकावर जाऊन पडतो. त्याच ठिकाणी स्थानांतरी-आरएनए प्रथिननिर्मितीसाठी अॅमिनो आम्ले घेऊन येतात. त्यानंतर संदेशवाही-आरएनए, रिबोसोमी-आरएनए, स्थानांतरी-आरएनए आणि विकरे एकत्र येऊन या अंमिनो आम्लांपासून प्रथिननिर्मिती होते. न्यूक्लिइक आम्ले प्रथिनांशी जोडलेली असतात. या प्रथिनांना न्यूक्लिओप्रथिने म्हणतात. ही न्यूक्लिओप्रथिने केंद्रकातील डीएनए रेणूंचे विकरांमार्फत होणारे विघटन रोखतात. डीएनएपासून संदेशवाही-आरएनए तयार होण्याच्या क्रियेवर या न्यूक्लिओप्रथिनांचे नियमन असते.

    The Secret of Science : What is RNA found in all living things?

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!