• Download App
    मेंदूचा शोध व बोध : मानवी शरीर म्हणजे खरे पाहिल्यास उलटे झाडच । The human body is, in fact, an inverted tree

    मेंदूचा शोध व बोध : मानवी शरीर म्हणजे खरे पाहिल्यास उलटे झाडच

    मानवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनने मानवाला उलट्या झाडाची उपमा दिली होती. त्याचे कारण म्हणजे झाडाची सारी मुळे जमिनीखाली असतात. तेथेच झाडांचे सारे नियंत्रण होत असते. म्हणजे झाडांची फांदी तुटली तर फार फरक पडत नाही पण मुळे तुटली तर मात्र झाड वालून जाते. मानवाचे तसेच असते. मानवाच्या साऱ्या शरीराचे नियंत्रण वर मेंदूत होत असते. शरीराच्या अन्य अवयवांना इझा झाली तर फरक पटत नाही. पण मेंदूला इजा होवून चालत नाही. मेंदूतील रचना फार क्लिष्ट असते. त्यात अशा अनेक गोष्टी असतात त्यामुळे त्याचे कार्य अव्याहतपणे नीट सुरू राहते. The human body is, in fact, an inverted tree

    यातील प्रमस्तिष्कमेरु द्रव हा पारदर्शक व रंगहीन द्रव असतो. मेंदूतील निलयांमध्ये प्रमस्तिष्कमेरु द्रव निर्माण होतो आणि निलयांना जुळलेल्या मस्तिष्क वाहिन्यांद्वारे मेंदू आणि मेरुरज्जूमध्ये अभिसरीत होत असतो. कोणत्याही क्षणाला प्रमस्तिष्कमेरु द्रवाचे आकारमान सुमारे १५० मिली लीटर असते. त्याची सतत क्षती आणि भरपाई होत असते आणि प्रत्येक पाच ते सहा तासांनी त्याची नवर्निमिती होत असते. मेंदूला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा दोन करोटीय धमन्या आणि दोन कशेरू धमन्या अशा चार धमन्यांद्वारे होतो. प्रत्येक करोटीय धमनी कवटीच्या शंखास्थीमधील नलिकेतून कवटीमध्ये शिरते. त्यानंतर ही धमनी मेंदूच्या तळाशी दोन शाखांमध्ये विभागली जाते.

    या धमन्यांद्वारे कान, डोळा, पियुषिका ग्रंथी, तसेच प्रमस्तिष्क गोलार्धांना रक्त पुरविले जाते. या धमन्या पाच सेकंद बंद पडल्यास बेशुद्धी येते आणि वीस सेकंद बंद पडल्यास चेतासंस्थेचे गंभीर विकार होऊ शकतात. उजव्या व डाव्या कशेरू धमन्या या उजव्या व डाव्या गळ्याच्या हाडाखालील धमन्यांपासून निघतात, कवटीच्या तळाशी असलेल्या बृहत्‌ रंध्रातून कवटीत शिरतात. तेथून एक उजवीकडे व एक डावीकडे अशा दोन शाखा निघतात. पुढे या शाखा एकत्र येऊन तल धमनी बनते. तल धमनीपासून अनेक शाखा निघून अनुमस्तिष्क, मस्तिष्क पुच्छ, अनुमस्तिष्क सेतू आणि प्रमस्तिष्क यांना रक्त पुरविले जाते.

    The human body is, in fact, an inverted tree

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!