• Download App
    शरीरात मेंदूच वापरतो सर्वाधिक उर्जा The brain uses the most energy in the body

    शरीरात मेंदूच वापरतो सर्वाधिक उर्जा

    दीर्घकालिक स्मृतीची प्रकट आणि अप्रकट अशी विभागणी केली जाते. प्रकट स्मृतींमध्ये तथ्ये, प्रसंग व घटना यांच्या स्मृती असतात आणि जाणीवपूर्वक त्यांची आठवण काढता येते. या स्मृतींची माहिती पद्धतशीर साठविलेली असते. अव्यक्त स्मृती एखाद्या कौशल्याच्या उदा., सायकल चालवणे, पोहणे इत्यादी किंवा एखाद्या कृतींच्या कार्यावलींच्या असतात. त्या सहजपणे आठवतात. त्या शरीराच्या आपोआप घडणाऱ्या संवेदीप्रेरक क्रियांच्या बनलेल्या असतात आणि इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की आपल्याला त्यांची जाणीव होत नाही. या स्मृती सराव आणि पुनरावृत्ती यामुळे बळकट होतात. The brain uses the most energy in the body

    अनुभव, विचार, संवेदना यांच्याद्वारा ज्ञान व आकलन प्राप्त करण्याच्या मानसिक प्रक्रियेला बोधन म्हणतात. ही बोधन प्रक्रिया ज्ञान, अवधान, दीर्घकालिक व अल्पकालिक स्मृती, अंदाज आणि मूल्यमापन, युक्तिवाद आणि संगणन, समस्या उकल आणि निर्णयन, आकलन आणि भाषा अशा विविध प्रक्रियांचा संच असतो. या प्रक्रियेत वर्तमान ज्ञान वापरले जाऊन नवीन ज्ञाननिर्मिती होते.

    वरील सर्व प्रक्रियांसाठी ललाटपूर्व बाह्यांग महत्त्वपूर्ण कार्य करते. शरीराने वापरलेल्या एकूण ऊर्जेपैकी सुमारे वीस टक्के ऊर्जा मेंदू वापरतो. कोणत्याही अन्य इंद्रियापेक्षा ही ऊर्जा अधिक असते. चेतापेशी सामान्यपणे ग्लुकोज चयापचयातून ऊर्जा मिळवितात. मात्र अतिश्रम, उपवास अशा कारणांमुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झाल्यास चेतापेशी कीटोन रेणूंपासून ऊर्जा मिळवितात. श्रमाचे काम करताना चेतापेशींना लॅक्टोजमधून ऊर्जा मिळते.

    तसेच मेंदूमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात ग्लुकोज थोड्या प्रमाणात असते. मधुमेही रुग्णांमध्ये रक्तशर्करान्यूनता ग्लुकोज कमी होण्याची क्रिया झाल्यास मेंदूला पुरेसे ग्लुकोज उपलब्ध होत नाही. अशी स्थिती त्या व्यक्तीसाठी घातक ठरू शकते. मानवी मेंदूची क्षमता सर्वसाधारण आघात शोषण्याएवढी सक्षम असते. पण डोक्यावर पडणे, आघातामुळे मेंदूत झालेला रक्तस्राव, विषाणूजन्य आजार, मेंदूआवरणदाह , कर्करोग, आनुवंशिक विकार, चेतांचे आजार, चेतापेशींचा परस्पराशी संपर्क खंडित होणे यामुळे मेंदूच्या कार्यांत गंभीर परिणाम होतात.

    मेंदूचा रक्तपुरवठा काही सेकंद खंडित झाल्यास मेंदूचा काही भाग पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत होतो. तसेच त्या भागाच्या कार्यात अपरिवर्तनीय बदल होतात. पाण्यात बुडणे, गुदमरणे, हवाविरहीत खोलीत अधिक वेळ काढणे अशामुळे झालेले मृत्यू मेंदू मृत झाल्याने होतात.

    The brain uses the most energy in the body

    Related posts

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!

    मोदींची आदमपूर हवाई तळाला भेट; बहादूर जवानांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!!

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!