• Download App
    विज्ञानाची गुपिते : तुमच्या आवडत्या संगणकाचे काम चालते तरी कसे? । Science Secrets: How Does Your Favorite Computer Work?

    विज्ञानाची गुपिते : तुमच्या आवडत्या संगणकाचे काम चालते तरी कसे?

    संगणकाचे यंत्र कसे चालते याची अनेकांना कल्पना नसते. अनेक ठिकाणी आज मनुष्याचे काम संगणक करतो, असे आपण बघतो. बँकेतील क्लिष्ट आकडेमोड असो, कारखान्यातील अनेक पदरी यांत्रिक काम असो किंवा सुरक्षा व्यवस्था असो, पुनरुक्ती असलेली अनेक कामे आज संगणक करताना दिसतो. मानवाची अशी अनेक कामे करणारा संगणक आणि मानवी शरीर यांची तुलना करताना आपल्याला काही साम्ये सापडतात. मानवी मेंदू पंचेंद्रियांद्वारे बाहेरून माहिती घेतो. चेतासंस्था ही माहिती मेंदूपर्यंत पोहोचवते. Science Secrets: How Does Your Favorite Computer Work?

    मेंदूत ही माहिती साठवली जाते. या माहितीवर जरूर त्या प्रक्रिया होतात. पुढील कार्य करण्याचे निर्णय मेंदूतील पेशी घेतात आणि तो आदेश चेतासंस्थेमार्फत योग्य त्या अवयवांना पोहोचवला जातो आणि हवे ते कार्य घडते. संगणकात कळफलक, माऊस, ध्वनिमुद्रक, कॅमेरा आणि इंटरनेटशी असलेला संपर्क या पंचेंद्रियांकडून माहिती जमा केली जाते. संगणकातील कार्यप्रणाली, ती माहिती हार्ड डिस्क समजू शकेल अशा भाषेत बदलवून हार्ड डिस्कपर्यंत पोहोचवते. हार्ड डिस्कमध्ये हे माहिती साठवली जाते. या माहितीवर आवश्यक त्या प्रकिया करण्याचे काम, मध्यवर्ती प्रक्रिया केंद्रातील (सीपीयू) सूक्ष्म चकतीमध्ये होते. ही चकती आणि हार्ड डिस्क म्हणजे संगणकाचा मेंदू. यांना काम करण्याची व्यवस्था लावणारी कार्यप्रणाली म्हणजे संगणकाची चेतासंस्था.

    संगणकातील सर्व भाग चालण्यासाठी ऊर्जेबरोबरच एक कार्यप्रणाली लागते आणि त्या भागांना समजेल अशा भाषेत दिलेल्या सूचना लागतात. उदाहरणार्थ- आपल्याला जर संगणकावर एखादे पत्र लिहावयाचे असेल तर प्रथम कळफलकावर असलेली अक्षरे दाबल्यावर ती माहिती आतमध्ये साठवणे, त्याच्यावरील पुढील संस्कार करणे याकरिता आधी एक कार्यक्रम लिहून तो संगणकात जतन करणे गरजेचे असते. पूर्वी जेव्हा कुठल्याही संगणकाला समजेल अशी समान भाषा उपलब्ध नव्हती तेव्हा प्रत्येक उपभोक्त्याला हा कार्यक्रम लिहावा लागायचा आणि अर्थातच त्यामध्ये खूप वेळ जायचा. आता हे तयार कार्यक्रम विकत मिळतात. मायक्रोसॉफ्टने बनवलेले वर्ड, एक्सेलसारखे कार्यक्रम आपल्या संगणकावर जतन केले तर त्या कार्यक्रमात शक्य असलेले/लिहून ठेवलेले कुठलेही काम आपण विनासायास करू शकतो. अनेक प्रकारचे कार्यक्रम एकाच संगणकात जतन करून वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देते.

    Science Secrets : How Does Your Favorite Computer Work?

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!