• Download App
    Sanjay Raut : संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे इंदिराजी - देवकांत बरुआंची आठवण!! । Sanjay Raut: Due to Sanjay Raut's statement, Indiraji - Devkant Barua is remembered !!

    Sanjay Raut : संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे इंदिराजी – देवकांत बरुआंची आठवण!!

    शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि किरीट सोमय्या यांच्यावर शरसंधान साधताना जी शिवराळ भाषा वापरली आणि त्याचे समर्थन केले, त्यावरून इंदिरा गांधी यांच्या सत्ताकाळातले काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवकांत बरुआ यांची आठवण ताजी झाली आहे…!! Sanjay Raut: Due to Sanjay Raut’s statement, Indiraji – Devkant Barua is remembered !!

    संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि किरीट सोमय्या यांच्या वर टीका करताना संजय राऊत यांची भाषा शिवराळतेपासून अहंकारापर्यंत पोहोचलेली दिसली. आधीच संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना “भडवा”, “च्युत्या” अशा शेलक्या शब्दांत दुगाण्या झाडल्या होत्या. पण आता त्या पलिकडे जाऊन किरीट सोमय्यांवर टीकास्त्र सोडताना किरीट सोमय्या आपल्यावर जी टीका करतात ती टीका आपल्यावर वैयक्तिक नसून ती टीका महाराष्ट्रावरती आहे आणि महाराष्ट्र द्रोह्याविषयी शिवराळ भाषा वापरणेच योग्य आहे, असे संजय राऊत म्हटले आहे.



    – राऊत म्हणजे “महाराष्ट्र”??

    “आपल्यावरची वैयक्तिक टीका ही महाराष्ट्रावरची आहे”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यानेच देवकांत बरुआ यांची आठवण झाली आहे. इंदिरा गांधी यांच्या ऐन भराच्या सत्ताकाळात देवकांत बरुआ यांनी इंदिरा गांधी यांची अफाट स्तुती करताना “इंदिरा इज इंडिया” आणि “इंडिया इज इंदिरा”, असे शब्दप्रयोग वापरले होते. त्या शब्दप्रयोगामुळे काँग्रेसजनांमध्ये प्रचंड “चैतन्य क्षोभ” पसरला होता. काँग्रेसजनांना ती भाषा प्रचंड आवडली होती. परंतु ही भाषा वापरल्या नंतर देवकांत बरुआ यांचे राजकीय भवितव्य काही काळासाठी उजळले, पण नंतर ते जे अंधकारात गेले ते पुन्हा प्रकाशात आले नाही. इतकेच काय पण अवघ्या दोन – तीन वर्षात इंदिरा गांधींना पराभवाचे तोंड पाहावे लागले, ही देखील वस्तुस्थिती होती.

    – बरुआंचा भूतकाळ आणि राऊतांचे भवितव्य

    आज संजय राऊत स्वत:ला “महाराष्ट्र” म्हणून घेत आहेत. इतकेच नाही तर आपण वापरत असलेल्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना ती भाषा आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे वापरत असत असेही ते म्हणाले आहेत. याचाच अर्थ त्यांनी स्वतःची तुलना अत्रे, प्रबोधनकार आणि बाळासाहेब या तीन महान व्यक्तींशी करून घेतली आहे. ही तुलना देखील आज संजय राऊत समर्थक शिवसैनिकांना जरूर आवडली असेल, पण जर इंदिरा गांधी यांच्यासारख्या बलाढ्य सत्ताधीशाला “इंदिरा इज इंडिया” आणि “इंडिया इज इंदिरा” असे म्हटल्यानंतर अवघ्या दोन-तीन वर्षात पराभवाचे तोंड पाहावे लागले असेल… तर संजय राऊत यांचे राजकीय भवितव्य काय असेल…?? आणि राऊतांना आपल्या बरोबर ठेवणाऱ्यांचे राजकीय भवितव्य काय असेल हा प्रश्न उद्भवत नाही का…??

    Sanjay Raut : Due to Sanjay Raut’s statement, Indiraji – Devkant Barua is remembered !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!