Tuesday, 13 May 2025
  • Download App
    राज्यसभेची सहावी जागा : शिवसेनेची कुचंबणा!! | The Focus India

    राज्यसभेची सहावी जागा : शिवसेनेची कुचंबणा!!

    राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीची भाजपशी तडजोड झाली तरी किंवा नाही झाली तरी सगळीकडून शिवसेनेची कुचंबणा होत असल्याचेच स्पष्ट दिसत आहे!! कारण तडजोड यशस्वी झाली तर शिवसेनेचा जादाचा उमेदवार मागे घ्यावा लागतो आणि तडजोड यशस्वी झाली नाही तर भाजपसमोर शिवसेनेच्या जादा उमेदवाराला लढत द्यावी लागून पराभवाचा धोका उत्पन्न होतो, अशी शिवसेनेची स्थिती झाली आहे. Rajya sabha Elections : Shivsena in trouble from NCP, Congress and BJP

    – विधान परिषदेसाठी तडजोड

    परंतु त्या पलिकडे जाऊनही आता तडजोडीच्या फॉर्म्युल्यात एक नवीन ट्विस्ट आला आहे. तो म्हणजे महाविकास आघाडीने भाजपला राज्यसभा निवडणुकीतील माघारीच्या बदल्यात जी विधान परिषदेची पाचवी जागा देऊ केली आहे, ती जागा शिवसेनेची आहे!! काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषदेच्या प्रत्येकी दोन जागा लढविण्यासाठी आग्रही आहेत आणि त्यांनी शिवसेनेला विधान परिषदेची एकच जागा लढविण्याचा आग्रह धरल्याची बातमी आली आहे. म्हणजे येथेही महाविकास आघाडी समसमान आमदार वाटप न राहता शिवसेना आघाडीतल्या पहिल्या क्रमांकाचा पक्ष असून सुद्धा विधान परिषद निवडणुकीत तोट्यात जातो आहे.

    – शिवसेना कात्रीत

    राज्यसभा निवडणुकीत विजय होण्यासाठी मते मिळण्याची खात्री नाही आणि या निवडणुकीत भाजपशी तडजोड केली तर शिवसेनेची विधान परिषदेची एक हक्काची जागा जाते, अशा कात्रीत शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांनी अडकवले आहे.

    – फडणवीसांकडे शिष्टाई

    महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे मंत्री सुनील केदार आणि शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या “सागर” या सरकारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीतील भाजपचा सातवा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. फडणवीस यावर दुपारपर्यंत निर्णय घेणे अपेक्षित ठेवले आहे.

    – चंद्रकांत दादांचा ट्विस्ट

    पण दरम्यानच्या काळात चंद्रकांत दादा पाटील यांनी आम्हाला केंद्राने “गो अहेडचा” निर्णय दिला आहे, असे सांगून राज्यसभा निवडणुकीतून भाजप माघार घेणार नसल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे शिवसेनेला भाजपच्या उमेदवारांची टक्कर घेणे भाग पडणार आहे. ही लढत अर्थातच कोल्हापूरचे दोन पहिलवान शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात होणार आहे.

    – काँग्रेस – राष्ट्रवादीची शिवसेनेवर कुरघोडी

    पण दुपारपर्यंत फडणवीसांनी निर्णय घेऊन धनंजय महाडिक यांना माघार घ्यायला लावली तर विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला तोटा होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष विधान परिषदेच्या प्रत्येकी दोन जागा लढविण्यावर ठाम आहेत. त्यांनी शिवसेनेला राज्यसभेतील तडजोडीच्या जागेवर बदल्यात विधान परिषदेच्या एका जागेसाठी “त्याग” करायला सांगितले आहे.

    – पवारांचा शब्द फिरला

    त्यामुळे एकूणच दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शब्दाला मान देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार फौजिया खान यांना राज्यसभेवर पाठवून शिवसेना 2022 च्या निवडणुकीत तोट्यातच जाताना दिसत आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या राजकारणात शरद पवारांचा शब्द दुसऱ्यांना फिरलेला दिसत आहे!!

    Rajya sabha Elections : Shivsena in trouble from NCP, Congress and BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक