• Download App
    दाभाडकर काका आणि राजकारण संघद्वेषाचे! Narayan Dabhadkar and politics of RSS hate

    दाभाडकर काका आणि राजकारण संघद्वेषाचे!

    दुर्दैवाने सकारात्मक असणारी बातमी नकारात्मक बनवण्याची, वादग्रस्त बनवण्याची जी निंदनीय कृती काही संघ द्वेष्टी मंडळींनी या घटनेचा बाबतीत चालवली ती अत्यंत निंदनीय आहे. अर्थात दुर्दैवाने काही लोकांना हा रोगच झाला आहे. पण यातून ते किती समाजाचे नुकसान करत आहेत याची त्यांना जाणीव नाही…


    दोन तीन दिवसापूर्वीं नागपूरहून एक बातमी आली. एक वयोवृध्द व्यक्तींनी आपला असणारा ऑक्सिजन बेड हा तुलनेने खूप तरुण असलेल्या व्यक्ती साठी सोडून दिला. नातेवाईक समजावून सांगत होते तरी पण ते ठाम होते .एक आयुष्य जगण्याची आसक्ती संपली होती आणि विरक्तीच्या सहज भावातून त्यांनी हे केले . त्यातून स्वतःचे प्राण देऊन त्यांनी एक कुटुंबच सावरण्यासाठी मदत केली . त्यांचे नाव नारायणराव दाभाडकर ! एका प्रभात शाखेचे नियमित स्वयंसेवक ! परिसरात भेटलेल्या चिमुकल्यांना चॉकलेट देण्याचा छंद त्यामुळे त्यांना चॉकलेट काका असे नाव पडले होते . Narayan Dabhadkar and politics of RSS hate

    ते तर गेले पण कवित्व मागे उरले. त्यांनी केलेल्या ह्या कृतीतून त्यांच्यावर झालेल्या संघ संस्काराची अभिव्यक्तीच त्यांनी व्यक्त केली . यात आपल्याला मरणोत्तर काही पुरस्कार मिळावा किंवा प्रसिद्धी मिळावी किंवा आपण ज्या संघटनेचे आहोत, त्या संघटनेचा उदो उदो व्हावा असा काही उद्देश त्यांचा नव्हता. सर्व समाज एक कुटुंब या भूमिकेतून एका वयोवृद्धाने आपल्या मुलासाठी केलेला हा त्याग होता . त्या चाळिशीतील व्यक्तीचे नावही या आजोबांना माहीत नव्हते . आपल्या या कृतीची वृत्तपत्रे ,TV सामाजिक माध्यमे यात एव्हढी प्रसिद्धी होईल याची कल्पना पण त्यांना नसेल .

    परंतु ,दुर्दैवाने सकारात्मक असणारी बातमी नकारात्मक बनवण्याची , वादग्रस्त बनवण्याची जी निंदनीय कृती काही संघ द्वेष्टी मंडळींनी या घटनेचा बाबतीत चालवली ती अत्यंत निंदनीय आहे. अर्थात दुर्दैवाने काही लोकांना हा रोगच झाला आहे. पण यातून ते किती समाजाचे नुकसान करत आहेत याची त्यांना जाणीव नाही . अवघड असणारी गोष्ट सत्य असली की ती दंतकथा ठरवायची . खोटी ठरवायची ह्या वृत्तीला काय म्हणावे ?



    वास्तविक संकट काळात समाजाच्या मदतीला धावून जाण्याची संघाची परंपरा आजची नाही . स्वातंत्र्य पूर्व काळापासून संघ स्थापनेपासून डॉक्टरांनी तो संस्कार स्वयंसेवकांच्या जडण घडणीचा आधार बनवला. ज्याला संघात नित्य सिद्ध शक्ती म्हंटले जाते . ही नित्य सिद्ध शक्ती म्हणजे यांत्रिक नाही तर देवदुर्लभ कार्यकर्त्यांची शक्ती आहे . पूर , भूकंप , दुष्काळ , विमान आणि रेल्वे अपघात अशा सर्व आपत्तीत जसा संघ धावून गेला , तसा
    या महामारीच्या काळात ही संघ धावून जातो आहे त्यात प्रसिद्धी ,श्रेय वा अन्य कुठलीही प्रेरणा नसून समाजाप्रती असणारी सहवेदनेची जाणीव आहे .

    त्या जाणिवेतूनच मग सहजपणे एखादा तरुण कार्यकर्ता स्वतःचा वाढदिवस साजरा करण्या ऐवजी अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार करण्यात स्वतःला धन्य मानतो .अनेक कार्यकर्ते स्वतःच्या जीवावर उदार होऊन तपासणी करण्यासठी वस्त्यामध्ये जाऊन काम करतात . कोविद सेंटर मध्ये पेशंटची सेवा करतात . प्लाजमा साठी रक्तदान शिबिर आयोजित करतात .कुणी दखल घ्यावी, प्रमाणपत्रे द्यावी हा यामागे हेतू अजिबात नाही . अंत्यसंस्कारासारखे काम सर्व स्वयंसेवक तर करत आहेतच पण समिती आणि इतर संघ विचाराच्या संस्थांतील महिला पण पुढे येऊन हे काम करत आहेत .

    पण जे विचार ,जे संघटना ,जे पक्ष अशा प्रकारची प्रेरणा आपल्या कार्यकर्त्यांत निर्माण करू शकले नाहीत ज्यांना असे कुठलेही विधायक काम उभे करता आले नाही ज्यांनी कार्यकर्त्यांना केवळ द्वेष च शिकवला , जात आणि प्रादेशिक अस्मिता यांच्या डबक्यात जे आयुष्यभर पोहत राहिले त्यांना संघाचे हे व्यक्ती निर्माण डोळ्यात सलत राहते आणि मग जसे जमेल तसे ते विरोध करत राहतात मग त्यात शाररिक हल्ले प्रसंगी जीव घेण्या पर्यंत यांची मजल जाते तर कधी शाब्दिक हल्ले ज्यात खालच्या पातळीवरील भाषा वापरली जाते . मग त्यात डावे , स्वतःला विचारवंत म्हणवणारे कुमारद्वय ते निखिल वागळेपर्यंत तमाम लुटीयन्स आणि माफीवीर कुबेरांचा गिरीश सहित महाराष्ट्रातील पुरोगामी पत्रकार मंडळी सामील होतात . विद्याधर गोखले आणि माधव गडकरी यांच्या परंपरेला पायदळी तुडवत लोकसत्ता चा फेक सत्ता करणाऱ्यांनी आज गोएंका यांच्या आत्म्याला पण रडवले आहे हे निश्चित !

    दाभाडकर काका ज्या इंदिरा गांधी हॉस्पिटल मध्ये होते ते सोडून दुसऱ्याच इंदिरा गांधी हॉस्पिटलची माहिती घेऊन दाभाडकार काकांचे बलिदान खोटे ठरवण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न काही मंडळींनी केला, त्यामुळे त्यांच्या या नीच कृतीने चित्रगुप्ताने पण मान खाली घातली असणार ! एकीकडे सम्पूर्ण मानव समूह हा या महामारीत
    संकटात सापडलेला असताना मोदी द्वेषाची संधी म्हणून जो काही तमाशाचा पुढचा अंक चालू आहे तो अत्यंत घातक आहे आणि नकळत या घटनेचा त्याच्याशी संबंध आहे .

    दाभाडकर असो किंवा अन्य कुठलाही ही स्वयंसेवक वा संघ विचाराची संघटना यांच्या द्वेषाचा का बळी ठरत आहे किंवा लक्ष होत आहे ? कारण सरळ आहे . ठाम पणे राष्ट्रीय विचाराची राजकीय अभिव्यक्ती करणारी माणसे केंद्रात सत्तेत आल्यावर संघ आणि संघ स्वयंसेवकांची कोणती पण कृती मोदी आणि त्यांचे सहकारी यांची राजकीय शक्ती बळकट करीत आहे ह्या भीतीने ते ग्रासले गेले आहेत .त्यामुळे राम मंदिर समर्पण निधीला ते खंडणी म्हणतात . साधूंवर अत्याचार होऊ देतात . निरलस भावनेने चालणारी सेवाकार्य आणि प्रकल्प यांची अडवणूक करतात . निःश्रेय कामाची संघ प्रेरणेचा फायदा घेत धारावी आणि अनेक कामाचे श्रेय लाटत राहतात आणि यासाठी डावी इकॉसिस्टम पण वापरत राहतात .

    माणसे ऑक्सिजन ,औषध किंवा व्हेंटिलेटर वाचून तर मरत आहेतच पण हॉस्पिटल ला आग लागून पण मरत आहे पण यांची इको सिस्टीम एका प्रामाणिक बलिदानाला खोटे ठरवण्याची चेष्टा करण्यात मग्न आहे .
    व्यक्ती आणि घराण्यांची जोडे उचलत खोटा प्रचार करणारे त्याग आणि निस्वार्थ भावना काय असते ते कधीच समजू शकणार नाहीत त्यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे . आपण एखादी गोष्ट करू शकत नसलो की जो ते करत असतो त्याला खोटे ठरवण्याचा नादान पणा हा निषेधार्ह आहे पण त्याच वेळेस ,

    नारायणराव, आम्हाला सर्व स्वयंसेवकांना तुमचा सार्थ अभिमान आहे. काका, तुम्ही तुमच्या जीवनातून आणि जातां ,जाता बलिदानातून असंख्य कार्यकर्त्यांच्यासाठी अंधारून आलेल्या संकटात एक दिव्य ज्योत पेटवली आहे . त्या ज्योतीने असंख्य स्वयंसेवकाना एक जीवन प्रेरणा मिळाली आहे आणि या प्रेरणेतून उद्याचा भारत घडण्यासाठी आम्ही कटीबद्ध होऊ !

    Narayan Dabhadkar and politics of RSS hate

    Related posts

    मोदींना हटवून म्हणे फडणवीसांना पंतप्रधान व्हायचे होते, राऊतांचा “जावईशोध”; पण मोदी – फडणवीस ही काय नरसिंह राव – पवार जोडी आहे का??

    लोकसभेच्या जागा वाटपात ठाकरेंनी काढली पवारांची “हवा”; तरीही पवार म्हणतात, विधानसभेला जास्त जागा खेचण्याचा आपला “इरादा”!!

    काकांच्या बेरजेच्या राजकारणात वजाबाकी कुणाची?? भाजप – सेनेची की पुतण्याची??