• Download App
    लाईफ स्किल्स : पुस्तके माणसाला रद्दी होण्यापासून वाचवितात । Life Skills: Books save a person from being discarded

    लाईफ स्किल्स : पुस्तके माणसाला रद्दी होण्यापासून वाचवितात

    जे लोक पुस्तके वाचतात त्यांची प्रगती होते. खरं तर पुस्तके माणसाला रद्दी होण्यापासून वाचवितात. त्यामुळे प्रत्येकाने पुस्तके वाचली पाहिजेत. आपल्या संग्रही ठेवली पाहिजेत. सध्याच्या काळात घरे आधुनिक झाली आहेत असे आपण पाहतो. पण या आधुनिकतेत पुस्तकांना फारशी जागा नसल्याचे दिसते. पण घरात पुस्तके असणे, त्याचं वाचन करणे हे प्रगतीसाठी फार गरजेचे आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्यांच्या घरात पुस्तके असतात त्यांनी त्यांची निगा राखण्यासाठी आठवड्याभरातून एखादा दिवस त्यासाठी थोडा तरी वेळ हा नक्की द्यायला पाहिजे. Life Skills: Books save a person from being discarded

    घरातील पुस्तके चांगल्या स्थितीत राहावीत म्हणून ती आद्रता नसणाऱ्या ठिकाणी ठेवावी, कारण कागद ओलावा शोषून घेत असल्याने ओलावा असणाऱ्या ठिकाणी, पुस्तकाची पाने लवकर फाटण्याची शक्यता असते. पुस्तकाची पाने उलटताना सावकाश उलटावीत. जोरात उलटल्याने शिलाई किंवा डकवण निघून पाने खिळखिळी होऊन निखळतात. पुस्तक वाचत असताना द्रवपदार्थ घेणे किंवा खाणे करू नये. कारण पुस्तकावर द्रवपदार्थ सांडून किंवा खाण्याच्या पदार्थाचा तेलकटपणा पानांना लागून कायम स्वरूपाचे डाग पडतात. पुस्तक एका बैठकीत वाचून होण्यासारखे नसेल किंवा काही वेळाने ते पुन्हा वाचायचे असेल तर वाचत असलेले पान टोकाला न दुमडता खुणेसाठी बुकमार्कचा वापर करावा.

    काही वेळा पुस्तके शेल्फमध्ये ठेवली जातात आणि ती महिनोन् महिने किंवा अगदी वर्ष वर्ष तशीच राहातात. तसे न करता महिन्यातून कधीतरी पुस्तके उघडून पहावीत. तशीच राहिल्यास त्याला कसर वा वाळवी लागते. पुस्तकांच्या शेल्फमध्ये कापूर, डांबरगोळ्या ठेवून कपाट व पुस्तकांचे आयुष्य वाढवू शकता. जे लोक वाचनाला छंद मानतात त्यांची प्रगती वगान हत राहते. पुस्तकांच्या रुपाने कोणतीही व्यक्ती दुसरे आयुष्य जगत असते. हे नेहमी लक्षात ठवण्याची गरज असते.

    Life Skills: Books save a person from being discarded

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!