निसर्गाने आपल्याला मुबलक दिले आहे पण तरीही आपण अधिकच्या हव्यासापोटी निसर्गाची मोडतोड करीत आहोत. त्याला आवर घालण्यासाठी आता जगभर प्रयत्न होत आहेत. जमिनीखालील इंधन वापरण्यापेक्षा सौर उर्जा, पवन उर्जा वापरून अनेक बाबी साध्य करता येतात हे आता कळू लागले आहे. सौर उर्जा किफायतशीर व रोजच्या वापरता कशी आणता येईल याचा आता फार मोठ्या प्रमाणात विचार केला जात आहे. Japan’s Toyota Transport car will run on solar energy
जपानच्या टोयोटा ट्रान्सपोर्टतर्फे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कारची निर्मिती करण्यात येत असून, कोणत्याही पारंपरिक इंधनाशिवाय ही कार चालवता येणार आहे. या विशेष कारची चाचणी कंपनी २०१८ पासूनच घेत आहे. टोयोटाच्या या कारमध्ये ११०० सोलर सेलचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही कार केवळ दिवसाच नव्हे तर, रात्रीही चालवता येणे शक्य होणार आहे. टोयोटाच्या मते अन्य कंपन्यांनी रूफवर सोलर पॅनेल लावण्याचे पर्याय उपलब्ध करून दिले होते. मात्र, ते यशस्वी ठरले नाहीत. ते अपयशी ठरण्याचे कारण म्हणजे सोलर पॅनेलच्या सनलाइटचे इंधनात बदलण्याचा दर कमी असणे, हे होय. मात्र, टोयोटाने या बाबतीत यश मिळवले आहे.
टोयोटाच्या सोलर पॅनेलची सनलाइटचे रूपांतर इंधनात करण्याची क्षमता ३४ टक्के अधिक आहे. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या अन्य पॅनेलची क्षमता केवळ २० टक्केच आहे. हे पॅनेल ०.०३ मिलीमीटर जाडीचे आहे. टोयोटाच्या मते सध्या बाजारात उपलब्ध सोलर कार जास्तीत जास्त सहा किलोमीटरचे अंतर पार करू शकतात. मात्र, टोयोटाची ही सोलर कार आठवड्यातील चार दिवस या हिशेबाने पन्नास किमीचे अंतर सहज पार करू शकेल. एकदा का या प्रकारच्या कार रस्त्यावर धावू लागल्या की पुढे त्यात अधिक संशोधन करून त्याचे अव्हरेज वाढवण्यावर भर दिली जाणार आहे. संशोधकापुढेचे हे फार मोठे आव्हान असणार आहे.