• Download App
    लवकर निवृत्त होणे म्हणणे फार सोपो, पण नोकरी सोडताना हा विचार कराचIt's easy to say retire early, but keep that in mind when leaving your job

    मनी मॅटर्स : लवकर निवृत्त होणे म्हणणे फार सोपो, पण नोकरी सोडताना हा विचार कराच

    लवकर निवृत्त होणार असे म्हणणे ही आजच्या तरुण पिढीची क्रेझच बनली आहे. मात्र हा निर्णय आर्थिक नियोजनतज्ज्ञाकडून चाचपून घेणे आवश्यक आहे.It’s easy to say retire early, but keep that in mind when leaving your job

    नियमबद्ध नोकरी, तेच तेच काम करून आलेला कंटाळा आणि दुसऱ्या बाजूला मनाला येईल तसे करण्याचे स्वातंत्र्य या द्विधा परिस्थितीमध्ये नोकरी सोडण्याचा विचार केला जातो. अशा वेळेस आर्थिक नियोजनतज्ज्ञाकडून खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी या बाबींचा विचार करावा.

    कर्जाचे हप्ते, घराचे कर्ज साधारणपणे वयाच्या पन्नास वर्षांपर्यंत चालू असते. एक कर्ज संपते तोवर जागा लहान पडू लागते. मोठी जागा घेण्यासाठी आधीचे घर विकून नवीन कर्ज काढले जाते. याच्या जोडीने वाहन कर्ज असते. निवृत्त होण्यापूर्वी सर्व कर्ज फेडली जाणे गरजेचे आहे.

    मुलांचे शिक्षण, लग्न यासाठी योग्य तरतूद असणे गरजेचे आहे. वाढत्या वयात वैद्यकीय खर्च वाढत जातात. असे म्हटले जाते की वैद्यकीय क्षेत्रात महागाई दरवर्षी १५-२० टक्क्यांनी वाढते. त्यानुसार मोठय़ा रकमेचा आरोग्य विमा आवश्यक आहे. आपल्या एकूण खर्चापैकी मोठा खर्च हा आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असतो. जीवनावश्यक गरजांसाठी फार कमी पैसा लागतो.

    निवृत्तीनंतर आपल्या जीवनशैलीत बदल करून खर्च कमी करावा लागतो. आयुष्यात शेवटी आनंद, समाधान हे महत्त्वाचे आहेच. पण आर्थिक सुबत्ता नसेल तर ते समाधान लटके पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय वयाच्या लवकरच्या टप्प्यावर जर घेणार असाल तर पुरेशी आर्थिक तजवीज करणे फार गरजेचे असते हे लक्षात ठेवायला हवे. अन्यथा त्यातून फारसे काही पदरात पडत नाही.

    It’s easy to say retire early, but keep that in mind when leaving your job

     

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!