ज्योती रेड्डी चा जन्म गरीब मजूर कुटुंबात झाला. ती चार भावंडांपैकी सर्वात मोठी होती. वडिलांना काम मिळायचे बंद झाल्यामुळे खाण्याचीही आबाळ होत होती. तिला अनाथाश्रमात पाठवले गेले. तिथे तिने १०वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.How to get success from failure in life?
५ वर्ष अनाथाश्रमात काढल्यावर ती घरी आली. वयाच्या १८व्य वर्षी तीच लग्न झालं. पुढे दोन मुली झाल्या. इथेही गरिबी दया दाखवेना. ५ रुपये दिवसाच्या पगारावर ती शेतात मजुरी करू लागली. इतके होऊनही ती तिने शिकण्याची इच्छा सोडली नाही. गावात सरकारी योजना आली. त्यात मोलमजुरी करणाऱ्यांसाठी रात्रशाळा भरणार होती.
सर्वाधिक शिकलेली असल्याने ज्योतीची तिथे शिक्षिका म्हणून १५० रुपये महिना पगाराने नेमणूक करण्यात आली. तिला शिक्षणाचं महत्व कळालं होतं. तिने मुक्त विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
बी.एड. ची पदवी घेऊन ती सरकारी शाळेत शिक्षिक झाली. ती काही परदेशस्थित नातेवाईकांना भेटली. काही भेटीतच तिने ठरवलं, कि आपल्या मुलींसाठी हे असं जीवन आपण मिळवायचं. ज्योतीने पुन्हा खूप मेहेनत केली, कष्ट करून पैसे जमवले. ती कॉम्पुटर सुद्धा शिकली. खूप प्रयत्नाने तिने अमेरिकेचा व्हिसा मिळवला. अमेरिकेत गेल्यावर तेथील नातेवाहीकांनी पाठ फिरवली. ज्योतीने हरायचं नाही असं ठरवलं.
सेल्सगर्ल म्हणून एका दुकानात ५ डॉलर दिवसाला अश्या पगारावर तिने पुन्हा सुरुवात केली. तिची धडपड पाहून एका सद्गृह्स्ताने मदत केली. तिने स्वतःचा उद्योग चालू केला. आता ती स्वतःच्या कंपनीची मालकीण आहे. अजूनही ती शिकते आणि पुढे खूप लांबचा यशस्वी प्रवास करेल.
आपल्या सोबत सुद्धा असं खुपदा होतं ना कि आपल्या प्रयत्नांना यश येत नाही, इच्छा पूर्ण होत नाहीत, वेळ लागतो काम व्हायला, आणि असं बरच काही. मग आपण निराश होतो, जगाला, स्वतः ला, देवाला, नशिबाला, आणि दिसेल त्याला दोष देऊ लागतो. त्यापेक्षा संकटाला संधी मानून पुढे जात राहिले तर यशाला गवसणी घालणे शक्य होते.