• Download App
    चुकीचा आहार मेंदूला आणि संपूर्ण शरीराला लोटतो संकटात। Diet effect on Brain

    चुकीचा आहार मेंदूला आणि संपूर्ण शरीराला लोटतो संकटात

    चुकीचा आहार मेंदूला आणि संपूर्ण शरीराला संकटात लोटत असतो. ते कित्येकदा आपल्या लक्षात येत नाही. काही मुलं अफेक्शन डेफिसिट हायपर अॅ क्टिव्हिटी डिसऑर्डरने ग्रासलेली असतात. ही मुलं एकाजागी बसू शकत नाहीत. एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. मेंदूतला प्री-फ्रंटल कॉर्टेक्स हा भाग अद्याप पुरेसा विकसित झालेला नसल्यामुळे हे घडतं. यावर उपचारासाठी केल्या जाणाऱ्या संशोधनातून असं आढळलं की, आहारात कृत्रिम रंग, कृत्रिम चवी आणि प्रिझव्‍‌र्हेटिव्ह असलेले पदार्थ जास्त असले तर त्याचा दुष्परिणाम होतो. सध्या शालेय मुलांचा ताबा ज्या पदार्थानी घेतला आहे, त्याचे घातक परिणाम असे साऱ्या शरीरावर होऊ शकतात. त्यामुळेच पदार्थ खाण्याआधी त्यातला धोका लक्षात घ्यायला हवा. असे पदार्थ टाळायला हवेत. हे पदार्थ मेंदूसाठी अयोग्य असतात. ज्यांना बौद्धिक कामांसाठी बुद्धी तरतरीत ठेवण्याची गरज असते, त्या सर्व वयाच्या लोकांनी हे टाळलं पाहिजे. या गोष्टी का टाळायला हव्यात, याचं कारण आपल्या मेंदूच्या रचनेत आहे. Diet effect on Brain

    मेंदूच्या चार पोकळ्यांमध्ये असलेला एक विशिष्ट प्रकारचा द्रव. या द्रवात ग्लुकोज, कॅल्शिअम, प्रथिने, सोडियम असे काही घटक असतात. हा द्रव शरीराच्या कोणत्याही कामासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. शरीराचं, बुद्धीचं सर्व काम याच्या मार्फतच चालतं. बुद्धी तरतरीत राहण्यासाठी जो चांगला खाऊ पेशींना द्यायला हवा, तो द्यायचं काम हा द्रवपदार्थ करत असतो. परंतु समजा चुकून या द्रवातल्या घटकांमध्ये काही प्रमाणात बदल झाला तर लहान मोठे घोटाळे व्हायला लागतात. मेंदूच्या पेशीच्या अंतर्गत जे संदेशवहनाचं काम अव्याहत आणि बिनबोभाटपणे चाललेलं असतं त्यात अडथळे येतात. म्हणूनच या द्रवाचं प्रमाण योग्य राहील याची काळजी आपलं शरीर घेत असतं. आपल्या शरीराला या कामासाठी मदत करायची तर योग्य आहार घ्यायला हवा.

    Diet effect on Brain

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!